जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या:माजी मंत्री राजकुमार बडोले

तुडतुडा सहीत इतर रोगाच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली मागणी.

0
346

गोंदिया:(२८ ऑक्टोबर): जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना हे सरकार सध्या वाऱ्यावर सोडत असल्याचा आरोप करत खरीप हंगामातील तुडतुडा,मावा, करपा, पाने गुंडाळणा-या अळ्यांच्या व इतर विविध रोगांचा प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या पिकांची तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे.

गोंदिया जिल्ह्या धान उत्पादन जिल्ह्या म्हणुन ओळखला जातो. विविध प्रकारच्या तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या धान पिकावर तुडतुडा, करपा, मावा यासारख्या विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे ऐन हातात येणा-या उत्पादनाचे नुकसान होण्याची भिती शेतक-यांमध्ये निर्माण झालेली आहे.भात पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने भात पीक घेणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. महागडी औषधी फवारणी करीत असतानाही रोग आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे जिल्ह्यात दिसुन येत आहे. परंतु आतापर्यंत शासन व प्रशासनाच्या वतीने शेताचे सर्वेक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे सरकारविरुद्ध तिव्र असंतोष निर्माण झाला आहे.
शासनाने जिल्हातील सर्व शेतक-यांच्या धान पिकाचे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

गोंदिया जिल्ह्यात धान पिकावर यावर्षी मोठ्या प्रमाणात तुडतुडा व इतर विविध रोगांचा प्रार्दुभाव झाल्याने धान उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकदा विविध औषधांची फवारणी करूनही धानपिक हातातुन गेले आहे. तुरळक पाऊस पडला तरी धान पीक चांगल्या स्थितीत होते मात्र गर्भावस्थेत असताना विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध प्रकारची औषधे विकत घेऊन फवारणी केली मात्र अनेक प्रयत्नानंतरही रोग नियंत्रणात आली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना पंचवीस टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे.