कृषी विधेयकाला घेऊन काँग्रेसचे मशाल आंदोलन

0
141

गोंदिया–केंद्र सरकारने शेती विषयक विधेयक अंमलात आणले. हे विधेयक शेतकरी विरोधी असून केंद्र सरकारने विधेयकाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, असा आरोप करीत काँग्रेस किसान आघाडीच्या वतीने आजपासून जिल्हाभरात मशाल आंदोलन व जनजागृती अभियानाला शुभारंभ करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सदर आंदोलन करण्यात येणार असून शेतकर्‍यांना केंद्र सरकारच्या काळ्या कायदाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने शेती विषयक विधेयक पारीत केले. दरम्यान या विधेयकाने शेतकर्‍यांनी कोंडी होणार असून या विधेयकांचा लाभ शेतकर्‍यांऐवजी थेट व्यापार्‍यांना होणार आहे, असे असले तरी केंद्र सरकार स्वत: पाट थोपटण्याचा काम करीत आहे. परंतु, पारीत केलेले शेतीविषयक कायदे हे शेतकर्‍यांसाठी काळे कायदे असून याचा काँग्रेस किसान आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
शेतकर्‍यांना या काळ्या कायद्यासंदर्भात माहिती व्हावी, किसान काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस किसान आघाडीच्या वतीने आजपासून मशाल आंदोलन उभारण्यात आले आहे. या आंदोलनातंर्गत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते केंद्र सरकारने पारीत केलेल्या शेतकरी विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. काल (ता.२८) काँग्रेस भवन येथे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांच्या नेतृत्व शेतकरी जनजागृती यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या यात्रेचे उद््घाटन प्रदेश सचिव विनोद जैन यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष एन.डी.किरसान यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी प्रदेश सचिव योगेंद्र भगत,अमर वराडे माजी जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे,अशोक(गप्पू)गुप्ता,राजु काळे, वंदना काळे,पप्पू पटले, शहर अध्यक्ष जहीर अहमद, युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष आलोक मोहंती, तालुका अध्यक्ष प्रशांत लिल्हारे, मनोज गजभिये, रमेश पटले, जीवन सलामे, गणेश हुकरे, डॉ.देवाजी कापगते, विशाल कापगते आदि पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकरी जागृती यात्रा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील गावागावात शेतकरी विरोधी कायद्याची माहिती देवून जनजागृती करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील २ लाख शेतकर्‍यांच्या स्वाक्षरी घेवून प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठविण्यात येणार आहे.