अंध बांधवांना काठी आणि जीवनावश्यक साहित्याचे वाटप

0
227

गोंदिया=पांढरी काठी दिन म्हणजेच अंध दिवसाचे औचित्य साधून खासदार सुनील मेंढे यांच्यावतीने अंध बांधवांना पांढरी काठी जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप आज खासदार जनसंपर्क कार्यालय गोंदिया येथे करण्यात आले. अंध बांधवांच्या जीवनात प्रकाश यावा म्हणून आपण सेवार्थाने पाठीशी असू, हा शब्द यावेळी शुभांगी मेंढे यांनी दिला.
राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विदर्भ विभागाच्यावतीने काही दिवसांपूर्वी खासदार सुनील मेंढे यांची भेट घेत अंध बांधवांना मदत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे असे आवाहन केले होते. दरम्यान कोरोना काळात व्यवसायाला मुकलेल्या अनेक अनेक अंध बांधवांवर ओढवलेल्या परिस्थितीची वास्तविकता जाणून घेतल्यानंतर खासदार मेंढे यांनी मदतीचा हात पुढे केला.
आज जागतिक पांढरी काठी दिन म्हणजे अंध दिवसाचे औचित्य साधून खासदार जनसंपर्क कार्यालयात गोंदिया येथे जिल्हातून आलेले अंध बांधवांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंध बांधवांना आधारासाठी पांढर्‍या काठ्या तसेच कोरोनामुळे विवंचनेत सापडलेल्याना जीवनावश्यक साहित्याचा संच भेट देण्यात आला.
अंधांचे आर्थिक उत्थान व्हावे, त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध होऊन त्यांच्या आयुष्यातील बेरोजगारीचा अंधार दूर व्हावा म्हणून त्यांच्या दृष्टीने सोयीचा असलेला उद्योग उभारण्याच्या दृष्टीनेही या वेळी अंध बांधवांशी चर्चा झाली. आपण सदैव अंध बांधवांच्या पाठीशी राहून मदत करू असा विश्‍वास यावेळी सौ. मेंढे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला भावना कदम जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा, गोल्डी गावंडे , वर्षा खरोले व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.