खा.पटेलांच्या उपस्थितीत तिरोडा, मोहाडी व तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची ३१ ऑक्टोबरला बैठक

0
330

भंडारा,दि.30ः-  मोहाडी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक दि. ३१ ऑक्टोंबर रोज शनिवारला दुपारी १२.०० वाजता वंजारी लॉन मोहाडी येथे व तुमसर येथे 3 वाजता राॅजाराम लाॅन व तिरोडा येथील कुंभारे लाॅन येथे सायकांळी 5 वाजता माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुलभाई पटेल यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली आहे. तालुक्यात पक्ष संघटना बांधणी व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिति, ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडणुकी संबंधाने बैठकीचे आयोजन करण्यात आलेले असून बैठकीला भंडारा जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे,गोंदिया जिल्हाअध्यक्ष पंचम बिसेन, प्रदेश महासचिव धनंजयजी दलाल, आमदार राजुभाऊ कारेमोरे, माजी खासदार मधुकरजी कुकडे,माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,माजी आमदार राजेंद्र जैन,भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष सुनिल फुंडे, विधानसभा प्रमुख विठ्ठलराव कहलाकर,राजलक्ष्मी तुरकर,रविकांत बोपचे,अविनाश जायस्वाल,अजय गौर उपस्थित राहणार आहेत.