भाजपच्यावतीने विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना एसडीओ मार्फेत निवेदन

0
200

अर्जुनी मोरगाव,दि.30ः-अर्जुनी-मोर भारतीय जनता पार्टी विधानसभा क्षेत्राच्या वतीने विविध मागण्यांच्या संदर्भात उपविभागीय कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले.तसेच आठ दिवसाच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.माजी आमदार इंजि.राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनांचे अर्थसहाय्य लाभार्थ्यांना ताबडतोब द्यावे.शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे.लॉकडाऊन काळातील विद्युत बिल माफ करावे, बंद असलेले रेती घाटांचे लिलाव करून सर्वसामान्यांना रेती उपलब्ध करून द्यावी. तुडतुडा मावा व धान पिकावर पडलेल्या विविध रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावे या मागण्यांचा समावेश होता. निवेदन देतेवेळी माजी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे,महामंत्री लायकराम भेंडारकर,तालुकाध्यक्ष अरविंद शिवणकर,डॉ.साहेबलाल कटरे,लक्ष्मीकांत धानगाये,शिशिर येळे, महामंत्री भोजू लोगडे,नूतन सोनवाने, प्रदीप मस्के, केवलराम पुस्तोडे, मंजुषा तरोने, रचना वकेकार, आनंदराव सोनवणे, उमाकांत ढेंगे, रामदास कोहाडकर, रघुनाथ लांजेवार तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.