गोरेगाव- केंद्रातील भा. ज. पा. सरकारने शेती व शेतकरी विरोधी तीन कायदे असंवैधानिक रीतीने पारीत केले आहेत. तसेच श्रम सुधार कायद्याच्या नावाने श्रमिक विरोधी विधेयके पारित केलेले आहे. देशातील शेतकरी, शेतमजूर,आडती, कामगार, कर्मचारी व लाखो लोकांनी या विधेयकांवर अक्षयअक्षय घेतलेली आक्षेप घेतलेली आहे. नवीन शेती विषयक कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्याची व्यवस्था पूर्ण पणे नष्ट होणार तसेच मालाच आधारभूत किमतही मिळणार नाही. तांदूळ, गहू, तेलबिया, डाळी, बटाटा, कांदा इ. तुना आवश्यक वस्तूंच्या यादीतून वगळया मुळे या वस्तूंची काळाबाजारी होईल. त्यामुळे शेतकरी अडचणीत येईल. निषेध व विरोध करुन सदर विधेयक केंद्र सरकारनी मागे घ्यावे. यासाठी काँग्रेस पार्टीने देश स्तरावर आंदोलन सुरु केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे नेते श्रीमती सोनियाजी गांधी व राहुल गांधीच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मा. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नेतृत्वात 2 कोटी सह्यांचे निवेदन महामहिम राष्ट्रपती महोदयांना 19 नोव्हे. रोजी देण्याचे ठरविले आहे. त्याचच एक भाग म्हणून गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारे जिल्हा अध्यक्ष डॉ. नामदेवजी किरसान यांचे नेतृत्वात सदर विधेयकांविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यांत येत आहे. जिल्ह्यातून 3 लक्ष 25 हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन देण्यांत येणार आहेत. यासाठी विधानसभा तालुका. व जिल्हा परिषद निहाय समन्वयंकांची नियुक्ती करण्यांत आलेली आहे. स्वाक्षरी मोहीम राबविताना जिल्हाध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान, उपाध्यक्ष पी. जी. कटरे, महासचिव एड. पुर्थ्वीराज चव्हाण, तालुका अध्यक्ष डेमेंद्र रहांगडाले व रविंद्र चन्ने उपस्थित होते.
गोंदिया जिल्हा काँग्रेसद्वारा कृषी कायद्याविरोधात स्वाक्षरी मोहीम
वाढदिवसाच्या शुभेच्छा