शेतकरी कायद्याविरोधात जिल्हा काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

0
116

गोंदिया,दि.31ः-केंद्रसरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले असून गावखेड्यात जाऊन शेतकर्याच्या स्वाक्षरी मोहिमेला सुरवात करण्यात आली आहे.या आंदोलनातंर्गतच आज शनिवारला(दि.31) येथील गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर गोंदिया जिल्हा काँग्रेसच्यावतीने सत्याग्रह करुन किसान अधिकार दिवस पाळण्यात आला.गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डाॅ.नामदेवराव किरसान यांच्या नेतृत्वात या आंदोलनात जिल्हा निरिक्षक आर.एम.खान नायडू यांनीही उपस्थित दर्शविली.
अलीकडेच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने बहुमताच्या बळावर पारीत केलेले तीन कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असून विरोधी पक्षाला विश्वासात न घेता व मतदान न करता असैवंधानिक पध्दतीने पारित केल्याने त्याचा विरोध करुन कायद्यात बदल करण्याची मागणी करण्यात येत आहे.देशपातळीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा नेतृत्वात तर महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आंदोलन सुरु केले आहे.
या सत्याग्रह आंदोलनात विनोद जैन, अमरे वराडे,पी.जी.कटरे,अशोक (गप्पू)गुप्ता,सुर्यकांत भगत,आंलोक मोहंती, हरिश तुडसकर,नसिम सिध्दीकी,बाबुराव मेश्राम,मिताराम नेवारे,रामेश्वर लिल्हारे,महेंद्रसिंह तवर,बलजीत सिंह बग्गा,पवन सागदेव, गंगाराम बावणकर, अविनाश बोरकर,नरेश कुमार लिल्हारे, अभिषेक जैन,अहमद सौय्यद,श्यामभाऊ गणवीर, लिखीराम बनोटे, सुभाष मडावी, जितेंद्र कटरे,गौरव बिसेन,अनुपभाऊ गजभिये,किरण लारोकर,योगेश अग्रवाल, दिपक उके, सुर्यप्रकाश भगत, राजकुमार (पप्पु) पटले, सचिन्न मेहर, आशिषकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.