सुभाष सोनवणे/चिचगड,दि.02:- शेतकरी आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी कटिबद्ध असून पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पाहता सक्रिय राहून व एकत्र काम करावे असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.ते देवरी तालुक्यातील चिचगड पालांदूर परिसरात भेटीवर आले असता पक्षपदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सभेत बोलत होते.यावेळी चिचगड येथील असंख्य महिलांनी राष्ट्रवादीत पटेलांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
या जनसंपर्क दौर्याच्या बैठकीत आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन,रमेश ताराम,सुनील फुंडे, गंगाधर परशुरामकर, सी.के. बिसेन, गोपाल तिवारी, कैलाश अग्रवाल, सुमन बिसेन, अर्चना ताराम,चंद्रपाल सहारा, फागनु कल्लो, बबलू भाटिया, प्रहलाद भोयर, पार्वतीबाई चंदेवार, मनीष मोटघरे, अमरदास आणि इतर उपस्थित होते.
आज झालेल्या या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे अधिकारी व कार्यकर्ते सर्वश्री देवधर कुंवर दादरा, बिसेलाल गुरुपंच, त्रिलोकसिंह चौहान, रतनलाल मेहेर, सुरेश शंचर, रवी इंगळे, शत्रुघ्न जपाटमार, हेमू बनसोड, संतोष मडावी, दुर्गाप्रसाद बाविस्कर, रामसिंग गंगाकचूर, टीकमदास सवर्साथी, कीर्तन मारी, रामलाल हलामी, चौकेश सोनकलिहारी, शांतदासदास, विजय अंबाडे, कमलेश मेहर, श्रीराम हातवार आदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला .