साकोली,दि.03: तालुक्यातील सानगडी व पालांदूर येथे परिसरातील राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष कार्यकर्ता बैठक खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी परिसरातील नागरिकांशी व पक्ष कार्यकर्त्यांशी खा. पटेल यांनी विविध विषयांवर चर्चा केली. खा.पटेल उपस्थितांना संबोधित करतांना म्हणाले की भंडारा जिल्हयाच्या विकासासाठी मी नेहमी कटिबध्द आहे. शेतकरी हिताकरिता राष्ट्रवादी पार्टी नेहमी अग्रेसर राहली आहे. शेतकरी अधिक आर्थिक सक्षम व्हावा याकरिता मागील वर्षी प्रमाणे यावर्षी धानाला 700 रुपये बोनस मिळणार आहे. आगामी जी.प, पंचायत समिती च्या निवडणुकीकरिता कार्यकर्त्यांशी एकजुटीने कामाला लागावे अश्या सुचना पटेल यांनी दिल्या. नानाभाऊ पंचबुध्दे, सुनिल फुंडे, धनंजय दलाल, सदाशिव वलथरे, सुरेश बघेल, शैलेश गजभिये, देवरावजी भांडारकर, विनोद रुखमोडे, जयदेव गोंधळे,रामकृष्ण टेभुर्णे, रेशीम दरवडे, लोकपाल गहाणे, नरेश फाये , सचिन तिरपुडे, महेश नंदरधने, वैशाली खेडकर, कमलेश उके, धनराज झोडे, खुशाल मरसकोल्हे, विलास वाघाये, विकास गभने, इद्रिसभाई लध्दानी, नागेश वाघाये, धनु व्यास, बालु चुन्ने, कृष्णा धकाते, मोहन राऊत , हेमाजी कापसे, सुधन्वा चेटुले, अतुल परशुरामकर,गुणवंत दिघोरे उपस्थित होते. या बैठकीत खा. पटेल यांच्या उपस्थितीत सर्वश्री मुरलीधर सार्वे, सुजीत गरेसामी,तेजराम बनकर,अतिश राघोर्ते,सोनु मेश्राम, अरमान शेडे, मनिश बोरकर, अंकित उके,तोमेश बनकर, जितेंद्र सोंद्रे, सुखदेव गोंधळे,मोहित शेळके, दिनकर झलके, राजु रोकडे, आदेश उपरिकर, गोपाल गोटेफोडे सचीन चोपकर, नंदकिशोर कांबळे,राजकुमार उपरिकर असंख्य भा.ज.पा. चे अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस प्रवेश केला.