गोंदिया,दि.07ःभारतीय जनता पक्षात संघटनात्मक विवीध पदावर जवाबदारी पार पाडणारे सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष भाजप नेते दीपक कदम यांची प्रशिक्षण सेल जिल्हा प्रमूख पदावर नियुक्ती भाजपा जिल्हा अध्यक्ष केशवभाऊ मानकर व बाळाभाऊ अंजनकर यांनी केली.
जिल्हय़ातून 10 वक्त्यांना प्रदेश कडूर वर्चुअल मिंटीगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येईल व नंतर हे वक्ते जिल्हय़ातील मंडळ निहाय 2 दिवसीय प्रशिक्षण वर्ग मध्ये मार्गदर्शन करणार.भाजप एक केडर पार्टी असून भाजपा एक विचार आहे.प्रशिक्षण वर्गामूळे पक्ष मजबूत होईल असा विश्वास दीपक कदम यांनी व्यक्त केला.