शहरात राष्ट्रवादीला बळकट करण्यासाठी कामाला लागावे : राजेंद्र जैन

0
108

गोंदिया,दि.09ःजनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. पक्षाचे ध्येय धोरण सर्वांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणार असून शहरात राष्ट्रवादीला बळकट करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित सभेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार जैन बोलत होते.
गोंदिया शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक ८ नोव्हेंबर रोजी स्थानिक राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आली होती. या सभेत नविन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. राष्ट्रवादी पक्षाशी युवतींना जोडण्यासाठी शहर युवती अध्यक्ष पदी सायमा खान यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार जैन पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते खा.प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने शहरातील समस्या मार्गी लावल्या जात आहेत. वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया – जबलपूर रेल्वे लाईन आदि कामे पूर्णत्वाच्या दिशेने आहेत. याचा निश्‍चितच लाभ शहरातील जनतेला होणार आहे. त्यामुळे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ज्या क्षेत्रात राष्ट्रवादीचा नगरसेवक नाही त्या क्षेत्रात अधिकाधिक लोक व सामाजिक कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडावे, प्रत्येक वॉर्डामध्ये पोहोचून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, पक्षाची विचारधारा जनमानसात पोहोचविण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहनही यावेळी जैन यांनी केले.
सभेला देवेंद्रनाथ चौबे, शिव शर्मा, अशोक सहारे, आशा पाटील, राजु एन. जैन, केतन तुरकर, मनोहर वालदे, नानु मुदलियार, बालकृष्ण पटले, राजेश कापसे, वेनेश्‍वर पंचबुध्दे, नागेंद्रनाथ चौबे, जनकराज गुप्ता, राजेश दवे, विनायक खैरे, दिपक पटेल, मो.खालीद पठान, मयुर दरबार, चंद्रकांत खंडेलवाल, प्रतिक भालेराव, संजीव राय, चंद्रकुमार चुटे, एकनाथ वहिले, सौरभ रोकडे, अक्की अग्रहरी, जिम्मी गुप्ता, राजेश वर्मा, विष्णु शर्मा , प्रितपालसिंग होरा, हरबक्ष गुरनानी, रमन उके, संजीव बापट, नागो बंसोड, महेश तिवारी, मिनू बग्गा, योगेश दर्वे, पुस्तकला माने, एकता मेर्शाम, कुणाल बावनथडे, अजित देशमुख, उमेंद्र गजभिये, थानेंद्रसिंग पवार,दिनेश्‍वर लाडे, कपिल बावनथडे, निखील बरबटे, चेतन मानकर, निलेश फुलबांधे, दर्पण वानखेडे, इंद्रजीत माने, निरज नागरे, अंकुश गजभिये, आमिर शेख, विशालसिंग ठाकुर, कमलेश बारेवार, सचिन पारधी, महेंद्र हरिनखेडे, गणेश पारधी आदि उपस्थित होते.