रावणवाडी येथे काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

0
9

भंडारा दि.१४: भंडारा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हा परिषद व पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्य आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा परिषद व पंचायत समिती पराभूत उमेदवारांचा रावणवाडी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात सत्कार करण्यात आला.
कार्यकर्तामेळाव्याचे उद््घाटन माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष जिया पटेल होते. यावेळी माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, जिल्हा महासचिव प्रेमसागर गणविर, सभापती नीळकंठ टेकाम, माजी सभापती युवराज वासनिक, प्रेमानंद नखाते, राजु सयाम उपस्थित होते. यावेळी समाजकल्याण सभापती नीळकंठ टेकाम, जिल्हा परिषद सदस्य प्रेमकुमार वनवे, प्यारेलाल वाघमारे, नीळकंठ कायते, मंजुषा जगनाडे, अनिता नागफासे, कुंदा वाघाडे, रामलाल चौधरी, सुनिल फुंडे, अशोक आकरे, शालीक भुरे, अशोक ईश्‍वरकर, संगीता धुळसे व भंडारा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य शाल व o्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी घनश्याम भांडारकर, बबनराव तिडके, शिवदास हटवार, राजु सुर्यवंशी, जनार्धन निंबार्ते, शर्मिल बोदेले, बंडु लांबट, विनोद जगनाडे, देवराम वाघाडे, विलास मोथरकर, मंगेश हुमणे, संजय धुळसे, प्रसनन चकोले, कार्तिकराम हटवार, धरमदास खोब्रागडे, आनंद तिरपुडे, अंकुश वंजारी, शांताराम हटवर, घनश्याम मोटघरे, ओमप्रकाश कुंडले, चंद्रभान कारेमोरे, विकास भुरे, सविता मोटघरे, चंद्रकला हटवार, रेखा हटवार, गौरी वंजारी, गाढवे, विजय वासनिक उपस्थित होते. संचालन राजकपुर राऊत यांनी तर आभारप्रदर्शन सचिन घनमारे यांनी केले.