
गोंदिया,दि.30ः-केंद्रातील मोदीसरकारला आज(दि.30) ७ वर्ष पूर्ण झाले,या सात वर्षाच्या अपयशाच्या विरोधात आज राज्यभरात काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन कऱण्यात आले.गोंदियात हे आंदोलन जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर गोंदिया जिल्हा काँग्रेस च्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान यांचे नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. बेरोजगारी ही १४ टक्यापर्यंत गेलेली आहे. मोदी सरकार देशातील लोकांना रोजगार देण्यात अपयशी ठरलेली आहे. असे असतांना सार्वजनिक उपक्रम ज्या मध्ये लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, ते मोदी सरकारने विक्रिचा सपाटा चालविलेला आहे . रेल्वे , विमानसेवा, विमा कंपन्या, पेट्रोलीयम कंपन्या, बँका, बंदरे , बीएसएनएल, सेल, असे अनेक सार्वजनिक उपक्रमांचे खाजगी करण करण्याचे धोरण सरकारने बंद केले पाहिजे जेणे करुन लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील . गेल्या वर्ष भरात काही ठरावीक श्रीमंत उघोगपती आणखी श्रीमंत झालेले आहेत. त्यांच्या संपतीत दुप्पटीने वाढ झालेली आहे. परंतू गरीब व मध्यमवर्गीय आणखी गरीब होतांना दिसत आहे. त्यामुळे सरकारचे आर्थीक नियोजन हे पुंजीपती धार्जीने आहे. यात बदल होणे आवश्यक आहे. केंद्र सरकाने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी गत ६ महिण्यापासून देशातील शेतकरी आंदोलन करित आहेत परंतू मोदी सरकार त्यांचे कडे हेतुपरस्सर दुर्लक्ष करित आहे. केंद्रसरकारने शेतकऱ्यांची मागणी मान्य करुन तीनही काळे कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी या आंदोलनाचे वेळी करण्यांत आली. धरने आंदोलनात गोंदिया जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेव किरसान, आमदार सहेसराम कोरोटे, कार्याध्यक्ष रत्नदिप दहिवले, काँग्रेस प्रदेश सचिव विनोद जैन, अमर वराडे, काँग्रेस युवा नेता अशोक ( गप्पु ) गुप्ता , एड.योगेश अग्रवाल, जितेश राणे , जितेन्द्र कटरे, दामोदर नेवारे, अलोक मोहंती, हरिष तुळसकर, रमेश अंबुले, जहिर अहमद, सुर्यप्रकाश भगत , परवेज बेंग , राजीव ठकरले, गंगाराम बावणकर, अरुण गजभिये, दिनेश तरोने, राजकुमार पटले, मधुसुधन दोनोडे, किशोर शेन्डे , सजंय बहेकार, पवन नागदेवे , आंनद लांजेवार, आकाश उके, चंद्रकुमार बागडे, सुनिल देशमुख, रवि क्षीरसागर, मंथन नंदेस्वर, हंसराज गजभिये इ. पदाधिकारी उपस्थित होते.