जसोदाबेन सुरक्षेमुळे चिंतीत!

0
7

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : माजी पंतप्रधान इंदिरा गांधीमची स्वचःच्या सुरक्षा गार्डनेच हत्या केली होती,यावरून मला दिलेल्या सुरक्षेचीही मला चिंता वाटत आहे, असे नमूद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहचारिणी जसोदाबेन यांनी त्यांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा तपशील मागणारा अर्ज आरटीआय अंतर्गत केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
गुजरातीमध्ये टंकलिखित केलेल्या तीन पानी आरटीआय अर्जात जसोदाबेन यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भावांना, बहिणींना व आपल्याला स्वत:ला ज्या आदेशान्वये सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे त्याची साक्षांकित प्रत देण्याची विनंती केली आहे. शिवाय पंतप्रधानांच्या कुटुंबाची सदस्य म्हणून सुरक्षेखेरीज अन्य कोणत्या सुविधा मिळण्यास आपण पात्र आहोत, याची माहितीही त्यांनी मागितली आहे. मला सुरक्षा देण्यात आली आहे. पण मी स्वत: सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करते व माझे सुरक्षा रक्षक सरकारी गाडय़ांमधून बरोबर येतात, असे जसोदाबेन यांनी अर्जामध्ये नमूद केले आहे.
गेली पाच दशके वेगळे राहणाऱया नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रत प्रथमच जसोदाबेन या आपल्या पत्नी असल्याचे नमूद केले. त्यानंतर मोदी पंतप्रधान झाल्यावर ‘प्रोटोकॉल’नुसार जसोदाबेनना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.
जसोदाबेन मेहसाणा जिल्ह्यातील उंझा शहराजवळील ब्राम्हणवाडा या गावात आपल्या भावासोबत राहतात.