विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ६ जुलैला

0
79

मुंबई,दि.01ः- नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसने दावा केला आहे. ही अध्यक्ष पदाची निवडणूक ६ जुलैला होणार आहे. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले. त्यानंतर हे विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे.
हे अध्यक्षपद काँग्रेसकडे जाईल, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट नव्हती. आता महविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये हे पद काँग्रेसला देण्यावर एकवाक्यता झाली आहे. विधानसभेचा अध्यक्ष हा काँग्रेसचा होईल, यासाठी ६ जुलैला निवडणूक होणार आहे. पक्षाचा आमदारांना व्हीप बजावण्यात येईल, तसेच मित्र पक्षांचे आमदार ही काँग्रेसच्या उमेदवारास निवडून देतील, असे विधिमंडळ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मराठवाड्यातील काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर, मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा आहे.