माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

0
19

मुंबई, दि. 20 : भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभर सद्भावना दिन साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त आज मंत्रालयात दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी आणि सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव इंद्रा मालो यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

जात-वंश-धर्म-भाषाविषयक भेदभाव न करता सर्वांनी सामंजस्याने कार्य करणे आणि अहिंसा व संविधानाच्या मार्गाने मतभेद सोडविण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भातील प्रतिज्ञा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांना दिली.

यावेळी आमदार भाई जगताप, आमदार जिशान सिद्दीकी, माजी आमदार नसिम खान आदीसह लोकप्रतिनिधी, मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांनी दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले आणि सामूहिक प्रतिज्ञा घेतली