शिवसैनिकांचे राज्यभर केंद्रीय मंत्री नारायण राणे विरोधात आंदोलन,राणेंचा नोंदवला निषेध

0
58

गोंदिया/अकोला/पुणे/नाशिक-जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिसून लागले आहेत.शिवसैनिक आक्रमक झाले असून आंदोलन, पोस्टरबाजी करत आहेत. नाशिकमधील शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर दगडफेक करून त्याची तोडफोड केली.अकोला,वाशिम,यवतमाळ याठिकाणीही शिवसैनिकांनी आंदोलन करीत राणेंचा निषेध नोंदवला आहे.गोंदिया येथेही शिवेसेनेच्यावतीने निषेध नोंदवण्यात आला.दरम्यान गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे यांनी पक्ष प्रमुख व मुख्यमंत्र्याविरुध्द नारायण राणेंनी केलेल्या अभद्र शब्दप्रयोगाचा निषेध करण्यात येत असून राणेंना महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नसल्याचेही म्हटले आहे.गोंदिया शहर पोलिस ठाण्यात शिवसेनेच्यावतीने नारायण राणे यांच्याविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे.यावेळी जिल्हा संघटक सुनील लांजेवार व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपर्य वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ अकोल्यात शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.राज्यभरात नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिक चांगलेच तापले आहेत.. राज्यात ठीक ठिकाणी नारायण राणे विरुद्ध पोलीस तक्रार आणि त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहेत..अकोल्यातही संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणे यांचा फोटो गाढवाच्या चेहऱ्यावर लावून राणेंचा प्रतिकात्मक पुतळा गाढवावर बसवून धिंड काढली… यावेळी राणे यांचा कोंबळी चोर’चा पोस्टर घेऊन त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली..

तर नारायण राणे यांचा कोंबळी घेऊन तयार केलेला पुतळाही यावेळी शिवसैनिकांनी जाळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न हणून पडला..यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये काहीसा संघर्षही झाला. जय हिंद चौक ते गांधी रोड पर्यंत हे आंदोलन करण्यात आलं.यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, मी कोणताही गुन्हा केलेला नाही, माझी बदनामी करत असेल तर मी गुन्हा दाखल करेन. माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची मला माहिती नाही. मुख्यमंत्र्यांकडून देशाचा अपमान झाला आहे. माहितीच्या आधारे मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचं मला माहिती नाहीये. गुन्हा नसताना वॉरंट निघालं, अटक होणार चालू आहे. मी काय नॉर्मल माणूस वाटलो का तुम्हाला असंही नारायण राणेंनी म्हटले आहे.

भाजप कार्यालयात सोडल्या कोंबड्या

तसेच पुण्यामध्ये शिवसेना कार्यकर्ते कोंबड्या घेऊन आंदोलन करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजीही करत आहे. दरम्यान, शिवसैनिकांनी भाजप कार्यलयात कोंबड्या सोडून राणे यांचा निषेध केला आहे.

नाशिकमधील भाजप कार्यालयावर दगडफेक

संतापलेल्या शिवसैनिकांनी नाशिकमध्ये भाजपचे कार्यालयाच फोडले आहे. जुन्या नाशिकमध्ये भाजपचे वसंत स्मृती या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. शिवसैनिक गाडीत बसून आले यानंतर शिवसैनिकांवर या कार्यालयावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. दरम्यान शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत होते. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला कोरोनाच्या काळात उत्तम प्रकारे सावरले आहे. ते आमचे कुटुंब प्रमुख आहे. उद्धव ठाकरेंवर टीका केली तर त्याचे जशास तसे उत्तर दिले जाईल असे शिवसैनिकांनी म्हटले आहे.

नारायण राणेचा युवा सेनेकडून निषेध….

युवा सेना माळशिरस तालुक्याच्या वतीने केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना बैल बनवून युवा सेना माळशिरस तालुक्याच्या वतीने युवा सेना तालुका प्रमुख गणेश इंगळे व युवा सेना अकलूज शहर प्रमुख शेखर खिल्लारे यांच्या नेतृत्वाखाली संगम येथे निषेध करण्यात आला. नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना पुन्हा एकदा जीभ घसरली. यावेळी त्यांनी केलेली टीका ही प्रत्येक शिवसैनिकाच्या जिव्हारी लागेल अशीच आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मंत्रालयात मी उपस्थित असतो तर कानाखाली चढवली असती असं वक्तव्य नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलं .स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी नेहमीच चाटू गिरी ची सवय लागलेल्या नारायण राणेना केंद्रीय मंत्री पद मिळाल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडले आहे. पण राणेनी एक लक्षात ठेवाव मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील किंवा शिवसेनेचे इतर कोणतेही नेते असतील त्यांच्या बद्दल अशाप्रकारे वक्तव्य करणाऱ्या चे हात छटायाची ताकत आम्हा युवा सैनिकांमध्ये आहे हे त्यांनी कदापि विसरता कामा नये. या आंदोलनावेळी माळशिरस तालुका युवा सेना तालुका प्रमुख गणेश इंगळे, अकलूज शहर प्रमुख शेखर भैय्या खिलारे, अकलूज शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब भोसले, आजिनाथ इंगळे, काकासो भोई, नाना पराडे, नवनाथ इंगळे, रामभाऊ इंगळे गणेश गायकवाड, दयानंद इंगळे पिंटू भोई ,अशोक भोई लालासाहेब भोई, बालाजी गायकवाड, नितीन इंगळे, सचिन इंगळे, प्रशांत इंगळे, विकास भाई, अविनाश भाई, दीपक भाई, सचिन भोई, ओम पराडे , शुभम भाई, ओम गायकवाड, शिवराज पराडे, बबलू इंगळे, इ युवा सैनिक उपस्थित होते.