शिवसेनेतर्फे गडचिरोली/अहेरीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात हल्ला बोल

0
32
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गडचिरोली दि.25:-शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी सोमवारी आक्षेपार्ह विधान केल्याने मंगळवारी शिवसेना पक्षाच्या वतीने अहेरीतील मुख्य चौकात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख व माजी जिल्हा प्रमुख राजगोपाल सुलवावार यांच्या नेतृत्वात निदर्शने व हल्लाबोल करून निषेध नोंदविले व तहसीलदार यांच्याकडे निवेदन सोपविले. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्याविषयी जीभ घसरवून एकेरी भाषेत वक्तव्य केल्याने आम्हा शिवसैनिकांचे भावना दुखावले असून नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची जाहीर माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी तीव्र व एकमुखी मागणी करून यापुढे असले प्रकार खपवून घेणार नाही असा इशाराही दिले आहे.
निदर्शने करतांना व निवेदन देतांना शिवसेनेचे अहेरी विधानसभा संघटक बिरजू गेडाम, तालुका प्रमुख प्रफुल्ल येरणे, सुभाष घुटे, सचिन गर्गम, लक्ष्मण राऊत, अहेरी विधानसभा महिला संघटिका पोर्णिमाताई इष्टाम, तालुका संघटिका तुळजाताई तलांडे, महेंद्र सुलवावार, मनीष इष्टाम, दिलीप सुरपाम, महेश मोहूर्ले आदी शिवसैनिक उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हा सहसंपर्क प्रमुख श्री.सुनिलभाऊ पोरेड्डीवार व गड.विधानसभा जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या नेतृत्वात नारायन राणे यांची प्रेत यात्रा काढुन सर्व शिवसैनिकांनी घोषणा देऊन जाहीर निषेध व्यक्त केला.यावेळी गडचिरोलीतील नंदु कुमरे, विधानसभा संघटक युवा सेना नेते राजु भुसारी,तालुका प्रमूख गजानन नैताम,अश्विनीताई चौधरी उपजिल्हा संघटीका, पुष्पा कोतवालीवाले,गड. तालुका संघटीका,किरण शेडमाके,अरुण शेडमाके, प्रविण रामगीरवार, नरेश चुटे,दिपक बारसागडे, ऐहमद मस्तान, संजय बोबाटे,नावेद पठान,निलु बारसागडे,आर्य मडावी,श्लोक चापले,शंशाक आकरे,अजय तुमराम, सचिन भोगे,सचिन मेश्राम,मोहन दिवटे,इंदर जगने,उपस्थित होते.