भाजप नेत्यांना माथेफिरू आणि केंद्रीय मंत्री यातला फरक कळतो?

0
43

*👉👉👉राणेंच्या बचावासाठी पवारांसंबंधित अजब उदाहरण*

मुंबई, २५ ऑगस्ट:-केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी मंत्री अनिल परब यांनी दबाव टाकला. त्यांनी काल गृहखात्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तसंच कोर्टाच्या निर्णायाआधी त्यांनी जामीनाचा निवाडा घोषित केला. यातून मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान झाला. हे सगळं प्रकरण संशयित आहे. त्यामुळे दबाव टाकणाऱ्या मंत्र्यासह IPS अधिकाऱ्यांची CBI चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.

*👉या सगळ्या प्रकारामध्ये अंतिमत:-*

आयपीएस अधिकारी केंद्राला जबाबदार असतात. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. राज्याचा एक मंत्री आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या अटकेसाठी फोन करत होते. कोर्टात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येईल, असा निवाडा ते घोषित करत होते. हे सगळं प्रकरण संशयास्पद आहे. याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कानशिलात एका व्यक्तिने लगावली होती. तेव्हा पवारांनी संयम पाळला आणि त्या व्यक्तिला माफ केलं. पवारांसारख्या संयमी माणसासोबत राहुनही शिवसेनेला ते कळत नाही?, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून शिवसेनेवर हल्ला चढवला. यावेळी शेलार यांनी थेट पवारांसोबत घडलेल्या घटनेचा दाखलाच दिला. शरद पवारांना कानशिलात लावलेली देशाने पाहिली. त्यावेळी शरद पवारांनी संयम पाळून त्या व्यक्तीला माफ केलं. पण संयमी माणसासोबत राहूनही शिवसेनेला ते कळत नाही, अशी टीका शेलार यांनी केली.