अट्टल मोबाईल चोरट्यास मोबाईल आणि चाकूसह गोंदिया रेल्वे पोलिसांनी केली अटक

0
69

गोंदिया – गोंदिया रेल्वे स्थानकावर चोरी करण्यासाठी फिरणाऱ्या छत्तीसगढच्या अट्टल मोबाईल चोरट्यास सहा मोबाईल आणि धारदार चाकूसह गोंदिया रेल्वे पोलिसांनी  अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे राजेश हर्ष बन्सोड (वय 22) वर्ष असे आहे. आरोपी कडून 43 हजार 200 किंमतीचे 6 मोबाइल जप्त करण्यात आले आहे.

गोंदिया रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे मोबाइल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले असल्यामुळे गोंदिया रेल्वे पोलिसांनी गस्त वाढवली असता, आरोपी राजेश हर्ष बन्सोड गोंदिया रेल्वेस्टेशन वर संशयास्पद हालचाल करताना आढळून आला. त्याला हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला घेराव घालून अटक केली आहे.

सदर आरोपीकडून 43 हजार 200 किंमतीचे 6 मोबाइल व धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चोरटा मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर धावत असलेल्या रेल्वेगाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चाकूच्या धाकावर मोबाईर चोरत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.