मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधात युवा स्वाभिमान पार्टीची तक्रार

0
37

अमरावती, दि 26- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचेबद्दल केलेल्या विधानावरुन त्यांच्यावर गुन्हे दाखल कऱण्यात आल्यानंतर आज आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पार्टी द्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांना त्याचाच चपला घेऊन त्यांच्याच थोबाड फोडाव असे वक्तव्य ठाकरे यांनी के ल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी युवा स्वाभिमानचे विनोद गुहे ,विरेद्र उपाध्याय जिल्हा संघटक,युवा स्वाभिमान पार्टी, पवन केशरवानी, अनिल मिश्रा शहर उपाध्यक्ष, सुरज मिश्रा, महेश मुलचंदानी,पवन हिंगणे,आकाश राजगुरे,पवन देशमुख,नितीन मस्के,अक्षय चौधरी, कृष्णा जाधव,आशिष मिश्रा आदि उपस्थित होते.