शिवसेनेच्या पाठीमागं ईडीचं शुक्लकाष्ठ! अनिल परबांनंतर ‘या’ बड्या नेत्यावर ईडीची छापेमारी

0
25

वाशिम | राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे अनेक नेते अंमलबजावणी संचलनालयाच्या रडारवर आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून मंत्री आणि आमदारांच्या पाठीमागे अंमलबजावणी संचलनालयाचा ससेमिरा लागला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी यवतमाळ, वाशिम दौरा केला होता. या दौऱ्या दरम्यान सोमय्यांनी वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत अंमलबजावणी संचलनालयाच्या चौकशीची मागणी केली होती.

सकाळी खासदार भावना गवळी यांच्या 5 शैक्षणिक संस्थांवर अंमलबजावणी संचलनालयाकडून छापेमारी करण्यात आली आहे. गवळींच्या पाच शैक्षणिक संस्थांच्या अधिकाऱ्यांची अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी करण्यात येत आहे.  किरीट सोमय्यांनी चौकशीची मागणी करताच आज छापेमारी करण्यात आल्याने राजकीय वर्तूळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

अंमलबजावणी संचलनालयाकडून आज सकाळी वाशिम जिल्हातील रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठान, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमीटेड या सर्व कंपन्यांनर छापेमारी करण्यात आली आहे, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, रविवारी परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस दिली आहे. याआधी महाविकास आघाडीच्या अनिल देशमुख, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक यांना अंमलबजावणी संचलनालयातर्फे चौकशी सुरू आहे.