पांढराबोडीच्या बैठकीत लहिटोला,गिरोला,लोहारा येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
41

गोंदिया,दि.11ः– गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पांढराबोडी येथे रिताराम लिल्हारे यांचे निवासस्थानी आयोजित कार्यकर्ता बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.यावेळी बोलतांना राजेंद्र जैन म्हणाले की,कोविड संक्रमण काळात ऑक्सीजनची पूर्तता व प्लांट लावण्याकरिता मदत, मेडिकल कॉलेज इमारतीची मान्यता, घरकुलचे प्रलंबित प्रश्न, या परिसरातील शेतकऱ्यांना शेतीकरिता पाणी उपलब्ध करण्याकरिता धापेवाड़ा प्रकल्प टप्पा २ चे विस्तारीकरण, शेतकऱ्यांना बोनस चा वादा पूर्ण करून शेतकऱ्यांना सलग दोन वर्षे बोनस देण्याकरिता प्रफुल पटेल यांनी सातत्याने प्रयत्न केले आहे. याउलट अच्छे दिनाचे स्वप्न दाखवुन भाजपा नेत्यांनी मोठं मोठी घोषणा केली. परंतु युवा बेरोजगार आहे, गैस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले आहे. पेट्रोल व डिझेल चे भाव वाढवून महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले आहे. तसेच विजय शिवणकर म्हणाले कि, प्रत्येक गावात बूथ कमिटी निर्माण करणे व आगामी जी. प.व पंचायत समिती च्या निवडणुकीत यश प्राप्त करण्यासाठी बूथ कमिटीचे सशक्तीकरण करणे आवश्यक आहे. पक्ष वाढीकरिता कार्यकर्त्यांनी सामान्य जनते पर्यंत पोहचून त्यांच्या अडी – अडचणी सोडविल्या पाहिजे.
याप्रसंगी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, रविकांत बोपचे, बालकृष्ण पटले, कुंदन कटारे, चंदन गजभिये, सौ. साधना चंदनलाल गजभिए, चंद्रकला वघारे, अश्विन ढोमणे, इंदल सिहारे, अरुण चौहान, राजू गौतम, पिंटू कटरे, राजेश नागपुरे, शैलेश वासनिक, सुनील पटले, स्वाती दमाहे, विनायक शर्मा, नागरत्न बांसोड, सनम बांसोड़, अश्विन चौहान, पिंटू कटरे, भगवत पटले, बाबा लिल्हारे, इंदराज चूलपार, नेमीचंद ढेकवार, राजेश नागपुरे, सौ. अंजू पंकज गजभिए, नितेश मेश्राम, गनीलाल शिहरे, संतोष राहगडाले, राजू येडे, बबलू कटरे, नीरजलाल उके,प्रताप दमाहे, संतोष तेलासे, दिनेश रहांगडाले, शंकर मेश्राम, पुंडलिक सुकाजी, राकेश मस्करे, हितेश लिल्हारे, विवेक गजभिये, दामोदर मेश्राम, लिखरं लिल्हारे, गोविंद तुरकर, लिखनदास नंदगावली, रामप्रशाद मेश्राम, प्रभुदास बावनथडे, भाऊलाल परतेती, ज्ञानीराम मस्करे, देवीलाल नागपुरे, रवींद्र तुरकर, लक्षमीचंद चुलपार, प्यारेलाल दमाहे, मुलचंद मेश्राम, अरविंद वगोर, श्रीराम शिववंशी, नंदू नागपुरे, श्रीप्रकाश ढोमणे, येशलाल पटले, आणून चौहान, सुखचंद काटेवार, श्रीराम नाईक, शिवलाल दखने, श्यामराव लिल्हारे, कालीराम सुलाखे, मदनलाल लिल्हारे, तेजराम येडे, सौ. साधना गजभिये, सौ. ललिताबाई चुलपार, सौ. ढोमेश्वरी चुलपार, सौ. योगशिला चुलपार, उदासन नागपुरे, सौ. ढेमनबाई मुजारे, सौ. तुळसाबाई नागपुरे व कार्यकर्ता उपस्थित होते.

या बैठकी प्रसंगी परिसरातील ग्राम पांढराबोडी, लहिटोला, गिरोला लोहारा, येथील अनेक कार्यकर्त्यानी खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विस्वास ठेऊन राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हा अध्यक्ष श्री विजय शिवणकर यांनी सर्व प्रवेशीतांना पक्षाचा दुपट्टा वापरून स्वागत केले. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात सर्वश्री लिखिराम लिल्हारे, घूसूलाल मेश्राम, रामप्रसाद मेश्राम, दामोधर मेश्राम, कुंडलिक भोयर, नरेश मेश्राम, लक्ष्मीचंद चुलपार, श्रीराम शिवबंशी, संतोष तेलासे, रवींद्र चूलपार, सौ. चंद्रकला वगारे, सौ. अश्विनी गजभिये, सौ. कैवला गजभिये, सौ. ईठाबाई मेश्राम, सौ. सविता वासनिक, सौ. पद्मा गजभिये, सौ. सुजिता गजभिये, सौ. योगशिला चुलपार, सौ. मालन कलसार, सौ. ललिता चुलपार, सौ. तुरशाबाई नागपुरे, सौ. यमुना सिहारे, उदासन नागपुरे, सौ. ढेमनबाई मुंजारे, सौ. कानसुराबाई दवारे, सौ. राजवंशीबाई दमाहे, सौ. तोमेश्वरी चुलपार, सौ. वनिता कुटमोळे इत्यादींनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश केला.