मुंबई-भाजपने इतरांना दोष देण्यापेक्षा जनतेची कामं करावीत अन्यथा आम्ही अधिवेशनादरम्यान सरकारविरोधात भूमिका घेऊ असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिला आहे. अजित पवार यांनी बुधवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना भाजपा व शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या आरोपप्रत्यारोपांवर भाष्य केले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करू नये. कोणाची तुलना कोणाबरोबर केली जाते यामध्ये लोकांना काहीच घेणेदेणे नसते. यापेक्षा शेतकऱयांच्याहिताची कामे करा असा सल्ला त्यांनी भाजपा व शिवसेनेला यावेळी दिला. शेतकऱयांचे प्रश्न न सोडविल्यास आगामी अधिवेशनात दुष्काळाच्या मुद्द्यावर राज्य सरकारविरोधात आंदोलन करु, असेही त्यांनी सांगितले.
भाजपला मोठ्या अपेक्षेने जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांनी इतरांना दोष देत बसण्यापेक्षा जनतेची कामे करावीत. दुष्काळप्रश्नी तत्काळ निर्णय घेऊन शेतक-यांना त्यांच्या शेतीमालाचा योग्य भाव मिळवून द्यावा, असेही ते पुढे म्हणाले.
अन्यथा भाजपविरोधी भूमिका घेऊ- अजित पवार
वाढदिवसाच्या शुभेच्छा