किसान मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रविकांत तुपकर

0
34

बुलडाणा- यांची शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर लढणार्‍या देशातील विविध दोनशे शेतकरी संघटनां मिळून देशपातळीवर स्थापन केलेल्या एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी व देशपातळीवर केंद्रीय समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची निवड करण्यात आली आहे. स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी  यांनी या निवडीच्या माध्यमातून तुपकरांच्या खांद्यावर केंद्रीय पातळीवर शेतकर्‍यांना न्याय देण्याची जबाबदारी सोपवली आहे. शेतकर्‍यांचा बुलंद आवाज असलेले रविकांत तुपकर यांनी आपली मुलुख मैदानी तोफ राज्याच्या कानाकोपर्‍यात धडधडती ठेवली आहे.केवळ शेतकरी, कष्टकर्‍यांसाठी तुपकर तहान-भूक हरवून अहोरात्र काम करताना दिसतात.महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी सरकारविरोधात त्यांनी वेळोवेळी आंदोलने उभारली. हा उमदा नेता आता देशभरातील बळीराजासाठी केंद्रीय पातळीवर लढतांना दिसणार आहे. दोनशे शेतकरी संघटनांमिळून एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाही एक संघटना स्थापन करण्यात आली असून,या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा व देशपातळीवर केंद्रीय समितीत महत्वाची जबाबदारी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
यानिमित्त देशभरातील नेत्यांशी संपर्क करून प्रश्न हाताळले जातील. हळूहळू राष्ट्रीय पातळीवर शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर रविकांत तुपकर लढतांना दिसतील. उत्तर प्रदेशचे शेतकरी नेते व्ही.एम. सिंग व स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांनी देशभरातील संघटनांना एकत्र करून देशपातळीवर एक मोठा फोरम तयार केला आहे. केंद्रीय पातळीवर काम करण्याची तुपकरांसाठी ही मोठी संधी चालून आली आहे.