गोंदिया पंचायत समितीवर चाबी राँकाचा झेंडा,भाजपचा पराभव

0
267

सभापतीपदी चाबी संघटनेचे मुनेश रहागंडाले तर उपसभापतीपदावर राकाँचे निरज उपवंशी

गोंदिया ,दि.06-  गोंदिया जिल्ह्यातील 8 पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज 6 मे रोजी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्याचे लक्ष असलेल्या गोंदिया पंचायत समितीमध्ये मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस व जनता की पार्टी(चाबी सघंटना)ला यश आले.निवडणुक अधिकारी उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील व गटविकास अधिकारी खोटेले यांनी निवडणुक प्रकिया पार पाडली.

गोंदिया  पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूकीचे समीकरण स्पष्ट झाले असून चाबी संघटना ही महाविकास आघाडीसोबत जाणार हे निश्चित झाले आहे. गोंदिया पंचायत समितीमध्ये 28 सदस्य संख्या असून चाबी संघटना 10,भाजप 10,राष्ट्रवादी 5 व अपक्ष 3 असे आहे. सभापतीपदी चाबी संघटनेचे मुनेश रहागंडाले व उपसभापतीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे निरज उपवंशी निवडून आले.चाबी संघटनेचे मुनेश रहागंडाले यांना 18 तर भाजपचे योगराज उपराडे 10 मते मिळाली,उपराडे यांचा 8 मतांनी पराभव केला.तर उपसभापती पदाच्या निवडणुकीत निरज उपवंशी यांनीही भाजपचे विनोद बिसेन यांचा 8 मतांनी पराभव केला. विजयी पदाधिकारी यांचे आमदार विनोद अग्रवाल,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र जैन,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर,छोटु पटले,शैलेष वासनिक, केतन तुरकर,माजी उपाध्यक्ष शिव शर्मा,कमलेश सोनवने,घनश्याम पानतवणे,मुकेश हलमारे,बेबी अग्रवाल,विक्की बघेले,छत्रपाल तुरकर,शैलजा सोनवने आदींनी अभिनंदन केले.