
भंडारा :- राज्यातील महाविकास आघाडीत कधीही शक्य नसलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आलेत. भाजपाला सत्तेपासून दूर सारण्यासाठी तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी केली. म्हणजेच ते तिन्ही भाजपाचे शत्रू पक्ष आहेत. भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने काँग्रेसचा जिल्हा परीषद अध्यक्ष बनला. भाजपचा जि. प. उपाध्यक्ष बनला. असे असतानांही माजी आमदार चरण वाघमारे यांना निलंबित करण्यात आले. मग भाजपचे शत्रुपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या नेत्यांनी पाठिंबा दिला त्यांना निलंबित का करण्यात आले नाही? असा प्रश्न भाजपमधील काही लोकांकडून उपस्थित केल्या जात आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला जे दिवस दिसले ते भविष्यात दिसायला वेळ लागणार नाही.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यासाठी भाजपच्या ज्या नेत्यांनी पुढाकार घेतला ते काय इमानदार झाले काय अशी विचारणाही आत्ता होऊ लागली आहे. तर गोंदिया जिल्हा परिषदेत आजपर्यंत काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालात त्यासाठी पुढाकार घेणार्यावर काय कारवाई केली असाही सूर निघू लागला आहे.
*गटनेता निवडण्यापासून सुरुवात*
मागील विधानसभा निवडणुकीत चरण वाघमारे यांनी आमदार असतांना अतिशय चांगले काम केले. भावी विधानसभा उमेदवार म्हणूनही त्यांना मोठी पसंती होती. असे असतानाही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तरीही निलंबन रद्द झाल्यानंतर त्यांनी भाजपचेच काम केले. जि. प. गटनेता निवडतानांही त्यांचे अत्यंत विश्वासू व जि. प. मध्ये सभापती राहिलेले संदिप टाले यांचेकडे दुर्लक्ष करुन नवख्या विनोद बांते यांना गटनेता निवडण्यात आले. तेव्हापासूनच चरण वाघमारे नाराज होते.





