सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले – खासदार पटेल

0
11

भंडारा  दि.20: : आम्ही सरकारमध्ये असताना जास्तीत जास्त शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी पैसेवारी योग्य पध्दतीने काढण्याचे अधिकार्‍यांना निर्देश दिले. आता खरी परिस्थिती लपवून पैसेवारी जास्त दाखविली जात असताना या सरकारने जिल्ह्यातील ९0 टक्के शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी केला.
भंडारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आढवा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, नगराध्यक्ष बाबुराव बागडे, जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती नरेश डहारे, सभापती शुभांगी राहांगडाले, कल्याणी भुरे, अँड.जयंत वैरागडे, अविनाश ब्राम्हणकर, सच्चिदानंद फुलेकर, हाजी सलाम उपस्थित होते.
यावेळी खा.पटेल म्हणाले, यावर्षीकिडीमुळे धानाचा उतारा आला नाही, अशा स्थितीत शेतकर्‍यांना संकटातून सावरण्यासाठी दिलासा मिळणे गरजेचे आहे. आधीच धान खरेदी केंद्र उशिरा सुरु झाले. त्यात आमच्या काळात शेतकर्‍यांना मिळत होते तेवढाही दर एचएमटी, जय o्रीराम या वाणांना आता नाही. जिल्ह्यात ९0 टक्के गावांमधील पैसेवारी ५0 टक्के पेक्षा जास्त दाखविल्यामुळे शेतकर्‍यांना शासकिय लाभांपासून शेतकर्‍यांना वंचित राहावे लागणार आहे. दीड वर्षातील सरकारच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली. सरकार घोषणा आणि मार्केटिंग करण्यात पटाईत असले तरी प्रत्यक्षात लोकांसाठी काय करीत आहे हे कोणालाच समजेनासे झाले आहे.
यावेळी नवनियुक्त डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. o्रीकांत वैरागडे व डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.जगदिश शेंडे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष सोपान आजबले यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रदेश सचिव धनंजय दलाल यांनी केले.