श्रीहरीकोटा येथून ‘PSLV-C31’चे यशस्वी प्रक्षेपण

0
10
वृत्तसंस्था
चेन्नई, दि. २० – इस्रोच्या ‘आयआरएनएसएस-१’ या पाचव्या उपग्रहाचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.  ‘पीएसएलव्ही-सी ३१’ या रॉकेटमधून आज सकाळी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. चेन्नईहून सुमारे १०० किमी दूर असलेल्या श्रीहरीकोटा येथून बुधवारी सकाळी ९ वाजून ३१ मिनिटांनी या उपग्रहाने यशस्वी उड्डाण केले. ४४.४ मीटर इतकी उंची असलेल्या या उपग्रहाचे वजन १४२५ ग्रॅम इतके आहे.
भारताने आत्तापर्यंत चार उपग्रह (आयआरएनएसएस-१ए, १बी, १सी आणि १डी) लाँच केले आहेत. १ जुलै २०१३ साली आयआरएनएसएस-१ए, तर एप्रिल २०१४ मध्ये आयआरएनएसएस-१बी प्रक्षेपित करण्यात आले. १६ ऑक्टोबर २०१४ साली आयआरएनएसएस- १सी आणि २८ मार्च २०१५ मध्ये आयआरएनएसएस-१डी चे यशस्वी प्रक्षेपण झाले.