
गोंदिया,दि.30 ः गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्व विदर्भात विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी हे आपल्या काही प्रमुख सहकाऱ्यांसह या जिल्ह्यात सातत्याने भेटी देऊन,बैठकी,मेळावे घेऊन सतत पाठपुरावा करीत आहेत.त्यातच मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यव्यापी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत तिरोडयातील भाजपचे माजी नगरसेवक संतोष मोहने व गोंदिया शहरातील सामाजिक कार्यकर्ते हरीकृष्ण चौधरी यांनी मनसेत प्रवेश केला.मुंबईतील रंगशारदा सभागृहात या प्रवेश कार्यक्रमाअगोदर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोहने व चौधरी तसेच मनसे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी,संपर्क अध्यक्ष राहुल बालमवार ,जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष मनीष चौरागडे, हेमंत लिल्हारे,उप जिल्हाध्यक्ष मुकेश मिश्रा,सुरेश ठाकरे,राजेश नागोसे,ब्रिजभूषन(छोटू) बैस या सर्व पदाधिकाऱ्यांसह चर्चा केली.