गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांचे भाजपमध्ये प्रवेश

0
56

अहमदाबाद : गुजरातचे प्रसिद्ध पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी काँग्रेस नेत्या श्वेता ब्रह्मभट्ट यांनी प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिकने कोबा परिसर ते भाजप कार्यालय ‘कमलम’ असा रोड शो केला, ज्यामध्ये हजारो लोक उपस्थित होते. यानंतर त्यांनी 12.39च्या विजय मुहूर्तावर कमलममध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत भगवा धारण केला.
हार्दिक यांची काँग्रेसबद्दलची नाराजी आता कोणापासून लपून राहिलेली नाही. याआधीही त्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. एका निवेदनात त्यांनी असेही म्हटले होते की, काँग्रेसमध्ये त्यांची अवस्था अशी झाली आहे की, नव्या वराची नसबंदी करण्यात आली आहे. मात्र, आपण राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांच्यावर नाराज नसून प्रदेश नेतृत्वावर नाराज असल्याचे त्यांनी सांगितले.

हार्दिक पटेल 2014 मध्ये सरदार पटेल गटात सामील झाले आणि नंतर पाटीदार आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. एकप्रकारे हा काळ त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात होता. सप्टेंबर 2015 मध्ये त्यांनी पटेल नवनिर्माण सेनेची स्थापना केली. कुर्मी, पाटीदार आणि गुज्जर समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून त्यांना सरकारी नोकऱ्या मिळाव्यात, हा त्यामागचा हेतू होता. या आंदोलनादरम्यान हार्दिक पहिल्यांदा प्रकाशझोतात आले.