तलाव पुनरुज्जीवन अभियानात गावांनी सहभागी व्हावे-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

0
19
वाशिम दि.०२(जिमाका) नीती आयोग, जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त वतीने जिल्हयातील 10 हेक्टरच्या आतील तलावांचे पुनरुज्जीवन अभियान सुरू आहे.या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून मिळणार असून शेतकऱ्यांनी तो आपल्या शेतात स्वखर्चाने टाकून शेतीची उत्पादकता वाढवायची आहे. तरी 10 हेकटरच्या आतील पाझर तलाव, सिंचन तलाव ,गाव तलाव असणाऱ्या गावांनी तातडीने तलाव पुनरुज्जीवन अभियानात सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.
       आज २ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या कक्षात आयोजित सभेत श्री.षण्मुगराजन बोलत होते.सभेला जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर,मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर व भारतीय जैन संघटनेचे नितीन राजवैद्य प्रामुख्याने
        जिल्हयात सुरू असलेल्या तलावांच्या पुनरुज्जीवन अभियानाचा आढावा जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी यावेळी घेतला.
       पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे करून उद्दिष्ट साध्य करण्यात यावे.या अभियानातून जिल्ह्यातील जास्तीत तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात यावे असे श्री.षण्मुगराजन यावेळी म्हणाले.या अभियानातून योजनेतून ८ लक्ष ३० घन मीटर गाळ काढण्याचे लक्ष नीती आयोगाने दिले आहे. त्यापैकी जवळपास 4 लाख घनमिटर गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे.यामध्ये वाशिम तालुक्यात १९, रिसोड तालुक्यात ९,मालेगाव तालुक्यात २, कारंजा तालुक्यात ११ आणि मानोरा तालुक्यात ५ कामे पूर्ण झाली आहे.पावसाळा जवळ आला असून पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त गावांमध्ये तलाव पुनरुज्जीवनाचे काम करून उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना श्री.षण्मुगराजन यांनी यावेळी उपस्थित सर्व तहसीलदार, बीडीओ व संबंधित यंत्रणांना दिल्या. जेणेकरून शेतकऱ्यांना मोफत गाळ उपलब्ध होऊल शेती सुपीक होण्यास मदत होईल व पाणी साठवणूक क्षमता वाढेल तसेच गावांनी व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. षण्मुगराजन यांनी केले.