तिरोडा/अर्जुनी मोरगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा

0
34

अर्जुनी मोरगाव,दि.10ः– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23 वा वर्धापन दिन 10 जून 2022 शुक्रवारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्याचे ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्याचे ध्वजारोहण गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणविर यांच्या हस्ते शहराध्यक्ष मनोहर शहारे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकाध्यक्ष लोकपाल गहाने, नगरपंचायत अध्यक्षा सौ. मंजुषा विरेन बारसागडे , माजी जिल्हा परिषद सदस्य रतीराम राणे, राकेश जयस्वाल ,किशोर तरोने, किरण ताई कांबळे,भोजराम रहिले, उद्धव मेहंदळे नगरसेवक सागर आरेकर, सभापती दानेश साखरे, दिक्षा दिनेश शहारे
यांची प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे म्हणालेत की प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार आपण वर्धापन दिन साजरा करत आहोत .पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार ,प्रफुल्ल भाई पटेल यांच्या धेय्य धोरणावर विश्वास ठेवून आपल्याला पक्ष बळकट करायचा आहे. जनतेची विकासाची कामे करून गाव गावागावात पक्ष पोहोचवायचे आहे यासाठी कार्यकर्त्यांनी कटिबद्ध असायला पाहिजे. गाव पातळीवर बूथ कमेटी मजबूत करून पक्षाची ध्येयधोरणे माननीय प्रफुल पटेल साहेब,माजी आमदार राजेंद्र जैन साहेब आमदार चंद्रिकापुरे साहेब, जिल्हा अध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या मार्गदर्शनात पक्ष लोकाभिमुख करायचा आहे . यावेळी वैभव जायस्वाल, विजय आरेकर , अनिशा पठाण, सुरेखा भोवते, नानाजी पिंपळकर ,माधुरी पिंपळकर, अजय पाऊलझगडे,अजय शहारे ,श्यामराव बांबोडे ,शालिकराम हातझाडे, सुदेश खोटेले ,विकास डुंबरे, आर. के .जांभुळकर ,शालिकराम नाकाडे ,किशोर ब्राह्मणकर, योगीराज हलमारे, मोरेश्वर रहीले, निप्पल बरय्या, दुर्गाप्रसाद पालीवाल, तुकाराम मडावी, भागवत मैंद तसेच पक्षाचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी सेल व आघाड्याचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

तिरोड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 23 वा वर्धापन दिन जल्लोषात

तिरोडा, दि.10 : आज तिरोडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रविकांत (गुड्डू) बोपचे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय येथे पक्षाचे ध्वजपूजन करून 23 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांना नेहमी प्राधान्य दिलेले आहे. त्यांच्या समस्यांसाठी झटत जनता-जनार्दनाच्या आशीर्वादाने, भक्कम साथीमुळे पक्षाने हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करीत २३ वर्षाचा टप्पा घातला आहे. यावेळी पक्षाच्या विस्तृत विचारधारेला एक व्यापक स्वरूप देण्यासाठी जबाबदारीने उपस्थित प्रत्येकाने समर्थपणे कार्य करण्याची शपथ घेतली.

हा पक्ष भारतीय संविधान, समतेची मूल्ये यांवर अढळ विश्वास असणाऱ्या प्रत्येक स्वाभिमानी माणसाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन निमित्ताने आपल्या महाराष्ट्राच्या मातीची ही स्वाभिमानाची शिकवण सर्वदूर पसरविण्यासाठी कटिबद्ध राहावे असे मत यानिमित्ताने करण्यात आले.यावेळी प्रेमकुमार रहांगडाले, युवा नेते रविकांत (गुड्डू) बोपचे, योगेंद्र भगत, राजलक्ष्मी तुरकर, अजय गौर, डॉ.अविनाश जायस्वाल, नरेश कुंभारे, कैलाश पटले, किरण पारधी, जगदीश बावनथडे, जितेंद्र (पिंटू) चौधरी, नासिर घानिवाला, किरण बंसोड, अतुल भांडारकर, राहुल गहेरवार, सोनू पारधी, वसीम शेख, बाबुराव डोमळे, अजित ठवरे, डॉ.संदीप मेश्राम, देवकुमार झरारीया, राजेश गुणेरीया, आनंद बैस, विजय बुराडे, जगदीश कटरे, विनोद उईके, उमेश पटले, नत्थुभाऊ बावनकर, वनमाला डहाके, पवन पटले, अलकेश मिश्रा, देवराज पारधी, विनोद कुकडे, महेश कुकडे, संजय चुटे, राजेश तुरकर, जितेंद्र बिसेन, संतोष लिल्हारे, मुन्ना बिंझाडे, विजय बिंझाडे, रोहित पटले, राजेंद्र केशरवानी, नरेश पटले, राजेंद्र पटले, आशिष चौधरी, रमेश भोयर, भोजराज नेवारे, राकेश वैध, विजय लिल्हारे, सोहनलाल पटले, अरविंद येळे, अशोक नागपुरे, यशवंत कडव आदी पक्षपदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.