आमगांवचा सर्वांगीण विकास करणार-आ.कोरोटे

0
34

आमगावं येथे सिमेंट काँक्रेट रोड बांधकामाचे भूमिपूजन

आमगाम,दि.20: आमगांव शहराचे रूपांतर नगरपरिषदेत झाल्यापासून अनेक कारणांनी या शहरातील सर्व विकास कामे रखडलेले होते. परंतु, आता सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. या शहराला सुंदर शहर बनविण्यास मी कशलीही कमी भासू देणार नाही. या शहराच्या विकासकामात येणाऱ्या सर्व समस्या मार्गी लावून आमगाव शहराचा सर्वांगीण विकास करणार, असे प्रतिपादन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
ते आमगाव येथे शुक्रवारी (ता.१७ जून) रोजी नागरी सुविधे अंतर्गत मंजूर २० लक्ष रुपये निधीचे नवीन सिमेंट काँक्रेट रोड बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार कोरोटे यांच्या हस्ते काँग्रेसचे आमगावं तालुकाध्यक्ष संजय बहेकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य छाया नागपुरे, छबू उके, यादवलाल बनोटे, उज्वल ठाकूर, महेश उके, रामेश्वर शामकुंवर, हंसू जोशी यांच्या सह शहरातील पक्षकार्यकर्ते आणि शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.