शिवसैनिकांचा संजय राठोडांना जोर का झटका, पूजा चव्हाण प्रकरणात करणार ‘हा’ धक्कादायक खुलासा

0
68

यवतमाळ | एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. हा वाद आता न्यायालयात गेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे दोन तृतीआंश आमदार आहेत. तसेच पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चर्चेत आलेले माजी वनमंत्री संजय राठोड हे ही शिंदे गटात सामिल आहेत. आता शिवसैनिकानींच पुजा चव्हाण प्रकरणातील पुरावे सादर करण्याची धमकी दिली आहे.पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ते त्यांच्या गटाला मिळून गुवाहाटीला गेले. त्यामुळे त्यांचे शिवसैनिक संतापले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय राठोड यांनी शिवसेनेसोबत बंडाळी केलेल्या एकनाथ शिंदे गटाला पाठींबा दर्शवल्यामुळे शिवसैनिक संतापले असून त्यांनी पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील पुरावे समोर आणण्याची धमकीच राठोड यांना दिली आहे. याप्रकरणातील 56 मिनिटांची एक सीडी आपल्याकडून असून, बंजारा समाजाची मुलगी त्याने कशी मारली हे त्यातून उघड होईल, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे.

पुजा चव्हाण बंजारा समाजाच्या तरुणीला मारुन संजय राठोड यांनी बंजारा समाजाशी बेईमानी केली. पुजावर त्याने कसे कसे अत्याचार केले हे आम्हाला माहित असून त्याचा पर्दापाश करु, असं गायकवाड यांनी जाहिर भाषणात सांगितलं. राठोड यांच्या विरोधात गळा काढणारे आता त्यांच्या मांडीला मांडी लाऊन कसे बसणारय़ असा सवालही गायकवाड यांनी केला.