भाजपाचा कार्यकर्ता मेळावा 10 रोजी

0
60

– पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा सत्कार कार्यक्रम

गोंदिया : राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार हे सोमवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी गोंदिया जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
या निमित्त दुपारी 01 वाजता फुलचुर नाका येथे त्यांचे स्वागत कार्यक्रम व सायंकाळी 04.00 वाजता श्री जलाराम लॉन, आमगाव रोड, फुलचुर येथे भाजप कार्यकर्ता मेळावा व सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांनी केले आहे.