डीपीडीसीच्या बैठकीत आमदार विनोद अग्रवाल यांनी मांडल्या समस्या

0
29

गोंदिया,दि.12-  गोंदियाचे पालक मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या   पहिल्याच बैठकीत गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी अनेक समस्या मांडून ना. सुधीर मुनगंटीवार यांचे ध्यान आकर्षित केले.

गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचे प्रथम आगमन होताच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गौण खनिज निधी संदर्भात अनेक मुद्दे उपस्थित केले. सिटी सर्व्हे लवकरात लवकर व्हावा व तलावाच्या संदर्भात कृषी विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी फायदेशीर योजना देण्यात यावी. ज्यामध्ये ९०% विहिरीला पाणी नाही, त्यामुळे त्या विहिरींचा काहीच उपयोग होत नाही आणि विहिरी रद्दच राहिल्या आहेत, यासाठी पृष्ठभागावर बोअरवेलची व्यवस्था करावी कारण पाण्याची पातळी कमी असल्याने पिण्यायोग्य पाणीही उपलब्ध होत नाही. यासोबतच वन्यप्राण्यांनी जख्मी झालेल्या शेतकरी इस्माना लवकरात लवकर आर्थिक मदत करावी. सोबतच आमदार विनोद अग्रवाल यांनी 2015 मध्ये नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी पालकमंत्री मा.सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर ठेवली. त्यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

या दरम्यान पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार, ख़ासदार सुनील मेंढे, खासदार अशोक नेते, विधायक विनोद अग्रवाल, विधायक परिणय फुके, विधायक अभिजीत वंजारी, पंकज रहांगडाले, अध्यक्ष जि.प.गोंदिया, नयना गुंडे जिल्हाधिकारी  पोलिस अधीक्षक विश्व पानसरे विधायक सहसराम कोरोटे, विधायक विजय रहांगडाले, विधायक मनोहर चंद्रिक्रापुरे, जिल्हा नियोजन अधिकारी कावले, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी पाटील, तहसीलदार खांडरे, व इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते.