मुंबई,दि.13-शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर शिवसेना प्रथमच ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नव्या नावासह मशाल चिन्हावर अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे.
या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. लटके या मुंबई महानगरपालिकेत कर्मचारी असल्याने त्यांनी एक महिन्यापूर्वी राजीनाम्याचा अर्ज दिलेला असून बीएमसी प्रशासनाने तो स्वीकारला नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com