*राष्ट्रवादी काँग्रेसने मोटासायकल रॅली काढून वेधले लक्ष*
*जिल्हाधिकाऱ्यांना, पोलीस अधीक्षक व रेल प्रसाशनाला दिले निवेदन*
गोंदिया- शहरातील उत्तर – दक्षिण भागाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम त्वरित पुर्ण करा, कुडवा लाईन परिसरातील पादचारी पूल सुरु करा तसेच शहरातील गंदगी व पिण्याच्या पाण्याची पूर्ती यासह विविध समस्यांना घेवून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात जनमोर्चा आंदोलन व मोटारसायकल रॅली काढून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
गोंदिया-बालाघाट मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याने तो पूल पाडण्यात आला. त्यामुळे शहराचे दोन भागात विभाजन झाले असून रेलटोली परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तर कुडवा लाईन परिसरातील रेल्वेचा पादचारी पूल सुध्दा रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे. त्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नवीन उड्डाणपुलाचे काम अद्यापही सुरु करण्यात आले नसून शहरवासीयांची समस्या कायम आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने अनेकदा पाठपुरावा व पत्र व्यवहार केला पण त्याची सुध्दा दखल घेण्यात आली नाही. कोरोना काळात बंद केलेल्या सर्व रेल्वे गाड्या पुर्ववत करण्यात याव्या. सिंगलटोली रेल्वे चौकी जवळ अंडरग्राऊंड पूल तयार करण्यात यावे, रेल्वे गाड्या आऊटरवर थांबवू नये, भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. मोक्षधाम परिसरातील केरकचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावण्यात यावी, प्रधानमंत्री शहरी घरकुल योजनेचे थकीत हप्ते त्वरित देण्यात यावे.दिवाळीपुर्वी शहरातील केरकचरा साफ करण्यात यावा, शहरावासीयांना नियमित पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, शहरातील स्ट्रीट लाईट सुरु करण्यात यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांना देण्यात आले. या समस्या त्वरित मार्गी न लावल्यास खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या जनमोर्चा व मोटार सायकल रैली मध्ये सहभागी झालेले सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, देवेंद्रनाथ चौबे, वीरेंद्र जैस्वाल, अशोक सहारे, चुन्नी बेंद्रे, आशाताई पाटील, प्रेम जैस्वाल, केतन तुरकर, रफिक खान, विशाल शेंडे, सतीश देशमुख, सुनील भालेराव, विनीत शहारे, हेमंत पंधरे, मनोहर वालदे, राजू एन जैन, नानू मुदलियार, वेनेश्वर पंचबुद्धे, राजेश कापसे, खालिद पठाण, रवी मुदडा, सैय्यद इकबाल, माधुरी नासरे, सुशीला भालेराव, पुष्पलता माने, सुदर्शना वर्मा, चंद्रकुमार चुटे, संजीव राय, सौरभ रोकडे, विनायक शर्मा, राजेश दवे, जुनेद शेख, कुंदा दोनोडे, विनायक खैरे, दीपक कनोजे, शंकर सहारे, एकनाथ वहिले, अजय जैस्वाल, टी. एम. पटले, जिम्मी गुप्ता, लव माटे, दर्पण वानखेडे, हर्षवर्धन मेश्राम, हरिराम आशवाणी, संजीव बापट, तुषार उके, संदीप पटले, चंचल जैन, रमेश कुरील, सोनम मेश्राम, जुनेद शेख, झलक बिसेन, राकेश वर्मा, आनंद ठाकूर, भरत बहेलिया, विक्रम बहेलिया, लखन बहेलिया, आकाश बहेलिया, रमन उके, नितेश खोब्रागडे, नागो सरकार, नागरत्न बनसोड, झणकलाल ढेकवार, राज शुक्ला, एकनाथ वाहिले, संजीव बापट, सुनील पटले, शैलेश वासनिक, महेश करियार, लव्ह माटे, प्रमोद कोसरकर, अमित देशमुख, शरभ मिश्रा, कृष्णा भांडारकर, श्याम चौरे, गुड्डू बिसेन, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, रौनक ठाकूर, नरेंद्र बेलगे, सोनू येडे, वामन गेडाम, भरत लामा, सबिल कुरेशी, आदित्य रोटकर, शबील कुरेशी, नकुल मुलनकर, यश शुक्ला, ओम शेंडे, अनीस कुरेशी, दर्शन हट्टेवार, जमीर शेख, तेजस पाठक, ज्योत्सना शहारे, सायली वाघमारे, सीमा भालेराव, सचिन चौरे, विक्रम भालेराव, सुरेश बोरकर, प्रफुल नकाशे, अदनान कुरेशी, अभिषेख देशमुख, अनुराग बरडे, बादल ठाकरे, लोकेश पटले, जितेश बिसेन, सतीश बिसेन, रुपेश मेंढे, उत्कर्ष देशमुख, रवी पाचे, उमेश हरदे, वरून मूलकर, आदित्य रोटकर, नकुल मुलकर, ओम , मनागेश रंगारी, करण कोल्ह्टकर, गोल्डी मेश्राम, रवी उके, शिवम डोंगरे, मायकल कडवं, गोल्डी नारनवरे, गौरव बांगरे, शुभम कोल्ह्टकर, राज माने, सुनील शेंडे, अविनाश राऊत, नितीन बन्सोड, किरण बाहे, सीमन चौधरी, श्रेयस खोब्रागडे, यश खोब्रागडे, अमित चौहान, विजय बोरकर, अंशुल खोब्रागडे, प्रेम गजभिये, सागर वासनिक, लोकेश रिणयात, विक्की रहांगडाले, विक्की कावड़े, नानू तुरकर, कुणाल हरिनखेडे, सुरेंद्र ऊके, राजा जैन, अजय सोनी, उत्कर्ष मेश्राम, अमित बन्सोड, नितीन सुखदेवे, अमन राहुलकर, प्रशांत उके, सुमित हुकरे, अमित हुकरे, राहुल किरणापुरे, इंद्रराज वनकर, अमल वाघाडे, विलास नागरीकर, अजय माने, पिंकी चौरासिया, नागेश जैस्वाल, संदीप पाचे, श्रवण ठेंगरी, राजू नेवारे, शिभू शेख, तौसिफ़ सैय्यद, युसूफ अली, सबिल शेख, कय्युम शेख, हाजी युनूस भाई, एजाज शेख, रोहित रंगारी, निखिल राऊत, सौरभ जैस्वाल, गौरव शुक्ला, प्रणय पटले, सौप्निल सोनोलें, निश्चल पालीवाल, संतोष शहारे, आकाश पारधी, यश टेम्भरें, राज शहारे, सागर तलवेकर, कृष्णकांत कंठाने, गौरव शेंडे, नरेंद्र जैतवार, वैभव गणवीर, अभिजित बोरकर, आदर्श मेश्राम, राजा गणवीर, अमित सोनटक्के, नानू उके, विवेक बिसेन, राजेश बालाधरे, रमेश मेश्राम, बिट्टू जैस्वाल, बंडू गडपायले, राजू भावे, देवेंद्र भेंडारकर, राजेश बाणासुर, रोहित करोत, विवेक शर्मा, सागर राऊत, आशिष शहारे, डेव्हिड यादव शहरातील गणमान्य नागरिक, व्यापारीगन, विद्यार्थी सह असंख्य कार्यकर्ता व पदाधिकारी जनमोर्चा आदोलनात सहभागी झाले.