15 नोव्हेंबरला महीला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ यांचा जाहीर सत्कार

0
29

गोंदिया : भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष चित्राताई वाघ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विदर्भ दौरा सुरु केला असून दि 15 नोव्हेंबरला त्या गोंदिया दोऱ्यावर येत आहेत. यावेळी महीला मोर्चा तर्फे महीला समाज भवन, सुभाष गार्डनच्या बाजूला सकाळी 11 वाजता महीला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी चित्राताई वाघ यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती महीला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम यांनी दिली आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष केशवभाऊ मानकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत कार्यक्रमात प्रामुख्याने खासदार सुनिल मेंढे, आमदार डॉ. परिणय फुकें, आमदार विजय रहांगडाले, जिल्हा परीषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, सर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य, सर्व माजी आमदार, सर्व जिल्हा परीषद सभापती, महीला मोर्चा चे वरिष्ठ पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व मंडळ पदाधिकारी व मोठ्या संख्येने महीला सदस्य उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महीला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम यांनी दिली आहे.