भारत जोडो यात्रेत युवक कांग्रेसचे माजी सचिव कादर शेख

0
15

चंद्रपूर/अकोला – कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत निघालेल्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.नफरत छोडो, भारत जोडो, महागाई, द्वेषाचे राजकारण, बेरोजगारी या विरोधात आपल्याला लढायचे आहे.
सध्या देशातील यंत्रणा राज्यघटनेविरोधात काम करीत आहे. देशातील युवक बेरोजगार झाला असून त्याकडे सत्ताधारी लक्ष देत नाही आहे, शेतकरी बेजार झाला आहे.यासाठी भारत जोडो यात्रा काढण्यात आलेली असून सर्वसामान्य नागरिक आज थेट राहुल गांधींची भेट घेत त्यांना आपल्या समस्या सांगत आहे.चंद्रपुरातील युवक कांग्रेसचे माजी सचिव कादर शेख यांना सुद्धा राहुल गांधी यांची भेट घेत त्यांच्यासोबत भारत जोडो यात्रेचा प्रवास करण्याचा योग आला.यावेळी शेख यांनी युवकांच्या प्रमुख समस्या राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या.आदर्श नेत्यांना भेटण्याचा योग हा प्रत्येक नागरिकांच्या नशिबी येत नाही मात्र भारत जोडो यात्रे दरम्यान हा योग जुडून आला.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रसार आम्ही आपल्या पध्दतीने जिल्ह्यात करू असा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे शेख यांनी सांगितले.यावेळी राहुल गांधी यांना चरखा भेट देण्यात आला.