आदिवासी मागास जिल्ह्याच्या समस्याकंडे मिंदेसरकारचे दुर्लक्ष-सुषमा अंधारे

0
17
गोंदिया– राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेला आदिवासी बहुल मागास जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे.याजिल्ह्याच्या अनेक समस्या उभ्या असून आरोग्याच्या समस्याकडे बघितल्यास सरकारने या जिल्ह्याच्या समस्यांकडेच दुर्लक्ष केल्याची टिका करीत समस्याविरोधात आवाज उठविण्यासाठी मजबूत विरोधी पक्षाची गरज असल्याचे विचार  गोंदियातील महाप्रबोधन यात्रेदरम्यान बोलताना सुषमा अंधारे यांनी मांडेल.
शिवसेनेच्यावतीने येथील भीमनगर मैदानावर आयोजित महाप्रबोधन यात्रेदरम्यान त्या बोलत होत्या.पुढे बोलतांना सुषमा अंधारे यांनी गेल्या काही महिन्यापुर्वीच आपल्या जिल्ह्यातील एका महिलेवर झालेल्या अत्याचारप्रकरणाला वाचा फोडतांना पोलीस प्रशासन व आरोग्य प्रशासनाने कशापद्दतीे त्या पिडीती महिलेवरच नव्हे तर कुटुबियांवर सुध्दा अन्याय केल्याचे सांगितले.तर एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री मी शेतकर्याचा मुलगा सांगत असताना आजही जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतकर्याला आपले धान व्यापारीवर्गाला विकण्याची वेळ आल्याचे सांगत शेतकरी मुलगा म्हणून सांगून काय अर्थ अशापद्दतीने मुख्यमंत्र्यावर टिका केली.
मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजनानी केलेल्या टिकेबद्दल बोलतांना महाजनांची भाची पंकजा मुंडेला कशापध्दतीने भाजपने बाहेर टाकले आहे,आधी त्याचा विचार करावा,आपल्या भाचीला ज्या भाजपने कैद करुन टाकले त्याच भाजपसाठी मनसेच्या माध्यमातून पाठराखण करुन काय सिध्द करता असे म्हणत राज ठाकरेंनी आपल्या प्रवक्त्यांची कार्यशाळा घ्यावी असे म्हणाल्या.शेजारील जिल्ह्यातील आमचे नरेंद्रभाऊ यांनी पोलीस अधिक्षकांची बदली फक्त आपल्या वाळू व्यवसायात ते अडसर ठरत असल्यानेच केल्याची टिका करीत उद्या नरेंद्रभाऊच्या भंडारा येथेही मी जाऊन त्यांना बोलणार असल्याचे म्हणाल्या.तर  आपल्याला आपले हक्क अधिकार समजून घेण्यासाठी संविधान कळले तरच सविंधानासोबत काय धोके सुरू झालेत हे कळेल.संविधानाने या देशाला दिलेल्या बहुपक्षीय पध्दतीला सध्या भाजप संपवण्याचे काम करीत असल्याचे सांगत विरोधी पक्षच जर राहिला नाही तर हुकूमशाही पध्दती रुजू होऊन देशाचे संविधानच नव्हे तर सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान होणार असल्याचेही त्या म्हणाल्या. राज्याचे गृहममंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून कधी काम करतील असे बोलत राज्यात ज्या पध्दतीने भाजपचे नेते व राज्यपाल महापुरुषांचा अवमान करीत आहेत,त्यावर कारवाई न करता गृहमंत्री गप्प बसून आहेत,यावरुन फडणवीसांचेच तर त्यांना पाठबळ नाही ना ही शंका व्यक्त करायला काय हरकत असे सांगतच रवी राणा व बच्चू कडूंच्या प्रकरणात फडणवीसांची खेळी य़शस्वी राहिल्याची टिका केली.राज्याला महिलामंत्री म्हणून विद्यमान सरकारकडे एकही पात्र महिला आमदार मिळाली नसल्याने महिलांच्या समस्या कोणाकडे मांडणार असा प्रश्न उपस्थित करुन आनंद दिघेंच्या नावावर सुरु केलेल्या आनदांचा शिधा मात्र मिंदेसरकारच्या मंत्र्याच्या फोटोसाठीचा कार्यक्रम ठरल्याचे त्या म्हणाल्या.या महाप्रबोधन यात्रेला निलेश धुमाळ,पंकज यादव,शैेलेष जायस्वाल ,सुनिल पालांदूरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.