राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व मंत्री चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करा

0
12

भाकप,एआयएसएफ व महिला फेडरेशन 
 भंडारा -: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हकालपट्टीसाठी 17 डिसेंबरच्या मुंबई महामोर्चाला भाकप,आॅल इंडिया स्टूडेंट्स फेडरेशन व भारतीय महिला फेडरेशन जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविणारा निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे भाकपचे जिल्हा सचिव काॅ. हिवराज उके यांच्या नेतृत्वात देण्यात आले. निवेदनात- छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या थोर महापुरुषांच्या बद्दल अवमानजनक विधाने करून बदनामी करून महाराष्ट्रद्रोही कृत्य करणाऱ्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी व भारतीय कम्युनिस्ट पक्षासह सर्व डाव्या, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष पक्ष व संघटनांच्या वतीने 17 डिसेबंरला मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येत आहे. या महामोर्चाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशन व भारतीय महिला फेडरेशन जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने आपला सक्रिय पाठिंबा जाहीर करण्यात येत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.शिष्टमंडळात काॅ.हिवराज उके,  काॅ. सदानंद इलमे,काॅ. प्रियकला मेश्राम, काॅ. प्रितेश  धारगावे , कॉम्रेड वैभव चोपकर,काॅ. वामनराव चांदेवार व काॅ. वाल्मीक नागपुरे यांचा समावेश होता.