अर्जूनी/मोर येथे खा.प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार

0
13

अर्जूनी/मोर –विकास कामे करतांना अनेक अडचणी येतात. ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा कालावधी हा केवळ पाच वर्षांचा आहे. या पाच वर्षांच्या कालावधीत आपण जे काम करू त्याच कामावरून आपली ओळख कायम गावकऱ्यांना आठवण करून देईल. गावात हे चांगले काम झाले आहे ते कोणाच्या सरपंचाच्या कार्यकाळात झाले आहे. त्यावरूनच तुमची ओळख कायमस्वरूपी लोकांच्या लक्षात राहील. गावात विकास काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणीला सामोरे जाऊन गावासाठी चागले काम करण्याची जिद्द माणसाच्या मनात असायलाच हवी असे मार्गदर्शन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

आज कृषी उत्पन्न बाजार समिती, अर्जुनी /मोरगांव च्या प्रांगणात नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार खासदार प्रफुल पटेल जी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री पटेल यांनी संबोधित करताना म्हणाले की, नुकत्याच झालेल्या तालुक्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकांतील निकाल लक्षात घेता येणार्‍या निवडणुकीत झालेल्या चुका पुन्हा न करता चुकांपासुन बोध घेत भविष्यात यश कशाप्रकारे मिळेल या करीता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिंकून देऊन जो विश्वास दाखवला त्याला विकास कामे करून सार्थक लावण्याचे प्रयत्न करू.

याप्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांनी निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे अभिनंदन करून अर्जुनी /मोरगांव तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच हीराबाई पधरे, विकाश वैद्य, मिनाती कीरतुरिया, विशाखा वालदे, संध्या आरसोड़े, बंसीधर लंजे, किरण ढवळे, बुंदेश्वरी राऊत, प्रदीप काबडे, लीना प्रधान, करणदास रक्षा, धनराज कांबळे, कुशन नेवारे, भुमीता ढोक, विवेक डोंगरे, बळीराम टेम्भूर्णे, छाया आमले, सरिता रामटेके, विलास फुंडे, निरुपा बोरकर, गणेशकुमार ताराम, मोहन साखरे, गीता नेवारे, रेखा सयाम, नरेंद्र लोथे, सुनील टेम्भूर्णे, संजय ईश्वार, संतोष मिर्झा, सरिता राजगिरे, सचिनकुमार डोंगरे, नाजूक लसूते, घनश्याम शहारे, गणिता नाकाडे, मीना शहारे, श्रीकांत लोणारे, मनोज देवराम भालखडे, रोशनी कोराम, आशा झीलपे, पंचशीला मेश्राम, जयश्री मस्के, सागर चिमणकर, संगीता कवडी सहित ग्रामपंचायत सरपंच व शेकडो सदस्यांचा ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

सत्कार कार्यक्रम प्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, सुनील फुंडे, यशवंत गणवीर, मंजुषा बारशागडे, लोकपाल गहाणे, डॉ अविनाश काशिवार, दाणेश साखरे, सागर आरेकर, सुशीलाताई हलमारे, दीक्षा शहारे, रमेश चुरहे, पुष्पलता दुरूगकर, आम्रपाली डोंगरवार, सोनदास गणवीर, यशवंत परशुरामकर, भोजराम राहिले, बंडूभाऊ भेंडारकर, मनोहर शहारे, रतिराम राणे, बन्सीधर लंजे, राकेश लंजे, योगेश नाकाडे, किरणताई कांबळे, शिला पटले, शिलाताई उइके, निशा मस्के, अनिषाताई पठाण, उद्धव महेंदळे, दीनदयाळ डोंगरवार, हर्षाताई राऊत, विकास रामटेके, देवानंद नंदेश्वर, आर के जांभुळकर, शालिकराम हातझाडे, माधुरी पिंपळकर, चित्रलेखा मेश्राम, नरेंद्र रंगारी, प्रशांत नाकाडे, श्यामकांत नेवारे, निप्पल बरैय्या, सुखदेव मेंढे, महेंद्र मेश्राम सहीत बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.