भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या संयुक्त मेळाव्यात पक्षाच्या 24 व्या महाधिवेशनाची रिपोर्टिंग
भंडारा -: माणसाची प्रतिष्ठा आणि समता निर्माण करण्यासाठी आम्ही कम्युनिस्ट झालो. कम्युनिस्ट पक्ष समाजवादी राज्यव्यवस्थेसाठी काम करतो. आणि आरएसएस-भाजप प्रणित मोदी सरकारला 2024 साली परत सत्तेवर येऊ द्यायचं नाही तसेच या सरकारला पाडण्यासाठी घटनेला, लोकशाही व धर्मनिरपेक्षतेला, मानणाऱ्या व समाजवादी भूमिका घेऊन लढणाऱ्यांची एकजूटता घडवून आणणे हाच पक्षाचा मुख्य कार्यक्रम आहे असे प्रतिपादन भाकप चे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो- दिल्ली यांनी पक्षाच्या 24 व्या राष्ट्रीय महा अधिवेशनाचे रिपोर्टिंग करताना केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या पक्ष कार्यकर्त्यांचा व सभासदांचा संयुक्त मेळावा दिनांक 11 जानेवारी 2023 ला लहरी मठ साकोली येथे पक्षाचे राज्य कौंसिल सदस्य काॅ. माधवराव बांते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
या मेळाव्यात पक्षाच्या आंध्र प्रदेशची राजधानी विजयवाडा येथे दिनांक 14 ते 18 ऑक्टोबर 2022 ला झालेल्या राष्ट्रीय महाअधिवेशनात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिस्थिती व राजकारण संघटनात्मक निर्णय व ठराव आणि कार्यक्रम पक्षाच्या सर्व सभासद व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉ.डॉ.भालचंद्र कांगो यांचे मार्गदर्शन झाले. याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय कौंसिल सदस्य कॉ. शिवकुमार गणवीर,राज्य सचिव मंडळाचे सदस्य व महाराष्ट्र आयटकचे राज्यसचिव कॉम्रेड श्याम काळे, राज्य कार्यकारणी सदस्य काॅ. हौसलाल रहांगडाले यांचेही मार्गदर्शन झाले तर मंचावर राज्य कौन्सिल सदस्या काॅ. करुणा-गणवीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
संयुक्त मेळाव्याची प्रस्तावना पक्षाचे भंडारा जिल्हा सचिव काॅ. हिवराज उके यांनी केले. संचालन पक्षाचे भंडारा जिल्हा सहसचिव कॉम्रेड शैलेंद्र गणवीर यांनी तर आभार गोंदिया जिल्ह्याचे सहसचिव कॉम्रेड रामचंद्र पाटील यांनी माणले.
सर्वप्रथम कम्युनिस्ट घोषणा पत्राचे निर्माते व समाजवादी क्रांतीचे प्रणेते कार्ल मार्क्स, फ्रेडरिक अँगल्स व लेनिन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व कम्युनिस्ट पक्षा विजय असो, मार्क्सवाद-लेनिनवाद जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, जय भीम लाल सलाम, साम्राज्यवाद मुर्दाबाद, समाजवाद जिंदाबाद इत्यादी घोषणा देण्यात आल्या.मेळाव्याला दोन्ही जिल्ह्यातील महिला पुरुष पक्ष कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती – त्यात प्रामुख्याने कॉम्रेड सदानंद इलमे, जयप्रकाश मसरके, गजानन पाचे, भूपेश मेश्राम, राजू बडोले, ज्ञानीराम नेवारे, सुनंदा रामटेके, देविदास कान्हेकर, प्रियकला मेश्राम, वाल्मीक नागपुरे, मंगेश माटे, रत्नाकर मारवाडे,महानंदा गजभिये, सीमा फुले, उर्मिला वासनिक, वनिता नंदेश्वर, मीनाक्षी बोंबर्डे,पुण्यवती गणवीर, रायाबाई मारगाये, प्रल्हाद उके, कल्पना डोंगरे, शेखर कनोजिया, मोहन सेलोकर, गोपीचंद मोहरकर, गोपीचंद गोमासे, नितीन कुमार वासनिक इत्यादींची उपस्थिती होती.अशी माहिती एका प्रसिद्धी पञका द्वारे काॅ.हिवराज उके यांनी दिली आहे.





