शिंदे- फडणवीस सरकारने बोनस च्या नावावर शेतक-यांची फसवणूक केली- खा. प्रफुल पटेल  

0
39

 गोंदिया:– महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असतांना सरकारने घानाला ७०० रूपये बोनस जाहीर केले होते व ते शेतक-यांना दिलं ही पण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकाने शेतक-यांना हेक्टरी १५ हजार रूपये चे बोनस हिवाळी अधिवेशन काळात जाहीर केलं पण आतापर्यंत त्यावर कारवाई होतांना दिसत नसून शेतक-यांच्या खात्यात पैसे आलेले नसल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने शेतक-यांची फसवणूक केली असल्याचा आरोप खा. प्रफुल पटेल यांनी गोंदियात आयोजित पत्रपरिषदेत केला आहे. पत्रपरिषदेला खा. प्रफुल पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणवीर, माजी नगराध्यक्ष दामोदर अग्रवाल,राष्ट्रवादी कांग्रेसचे संगठन सचिव विरेंद्र जायसवाल आदी उपस्थित होते.

राज्यात होवू घातलेली शिक्षक मतदारसंघा सह विधान परिषद निवडणुकीवर बोलतांना खा. पटेल म्हणाले की नामांकन दाखल करण्यापूर्वीच महाविकास आघाडीतील तीन ही पक्षांचे नेते एकत्र बसून जर योग्यरित्या जागेची वाटणी केली असती व उमेदवारांची निवड ही योग्य प्रकारे केली असती तर आज उद्भवलेली परिस्थिती नसती. राष्ट्रवादी काँग्रेसचे या निवडणुकीत औरंगाबाद चे विक्रम काळे हे आमचे उमेदवार आहेत. या व्यक्तरिक्त चार जागेवर आमचे उमेदवार नसल्यामुळे झालेली तडजोडी विषयी भाष्य करणे मला योग्य वाटत नसल्याचे पटेल म्हणाले. ज्या पक्षाचे उमेदवार आहेत त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी याबाबतची काळजी घेणे गरजेचे होते असे ही पटेल म्हणाले, आपण पुढील लोकसभेची निवडणुक लढणार का या प्रश्नावर पटेल म्हणाले की त्यावेळ जी परिस्थिती असेल त्यानुसार निर्णय घेतला जाईल. सध्या मी २०२८ पर्यंत खासदार असल्यामुळे मला त्याची काळजी नसल्याचेही पटेल म्हणाले.

राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हणाले यावर पटेल म्हणाले की स्वातंत्र्य प्राप्तीकरीता सगळयांनी आपआपले योगदान त्यावेळी दिले आहे. त्यामुळे अशी टिका करणे उचित नाही, राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत संजय राउत यांच्या जम्मू येथील सहभागावर पटेल म्हणाले की भारत जोडो यात्रेत इतर पक्षाच्या नेत्यांनीही सहभागी व्हावे असे निमंत्रण सहयोगी पक्षांना दिले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात यात्रा असतांना खा. सुप्रिया सुळे व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सहभागी झाले होते. पुढील होव घातलेल्या कसबा आणि चिंचवड येथील निवडणुक अंधेरी पूर्व पद्धतीने लढविली जाईल की काय ? या प्रश्नावर पटेल म्हणाले की सध्या याबाबत निर्णय झालेला नाही. पण त्यावर पक्षाची बैठकीत निर्णय घेतला जाईल असे पटेल म्हणाले, अजित पवार यांनी म्हटलेल्या धर्मवीर वा स्वराज्यरक्षक या प्रश्नांवर पटेल म्हणाले की याविषयी आतापर्यंत बरीच चर्चा झालेली आहे. त्यामुळे त्यावर आता बोलणे उचित नाही असे पटेल म्हणाले, महाविकास आघाडीत वंचित च्या सहभागावर पटेल म्हणाले की त्यांची उद्भव बाळासाहेब ठाकरे सोबत युती करणार आहे. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीत सहभागावर आतातरी यावर बोलणे शक्य नाही. गोंदियातील नाटयगृहाच्या बांधकामावर पटेल म्हणाले की त्या समोरील काढण्यात आलेल्या दुकानांमुळे नाटयगृहाचे सौंदर्य झाकोळले जात असल्यामुळे त्यात बदल घडविण्यात यावा अशी आमची मागणी आहे. गोंदियातील उड्डाणपुलाविषयी बोलतांना पटेल म्हणाले की जुनं तोडण्यापूर्वी व नविन बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी लोकांना कमी त्रास कावा अशी योजना आखायला हवी होती पण ते न झाल्यामुळे आता जनतेला त्रास सोसावा लागत असल्याचेही ते म्हणाले.