गोरेगाव येथे काँग्रेसचे हात से हात जोडो अभियान

0
14

गोरेगांव,दि.31ः-काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या हात से हात जोडो अभियानांतर्गत गोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने हात से हात जोडो कार्यक्रमाचे आयोजन आदीलोक भवन येथे करण्यात आले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पुजन करुन संविधान प्रास्तविकेचे वाचन करुन पक्ष ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव जगदिश येरोला यांच्या अध्यक्षतेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव पी.जी.कटरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमाला गोरेगांव तालुका काग्रेस कमेटी अध्यक्ष डेमेन्द्र राहंगडाले ,जि.प. सदस्य शशी भगत, गोंदिया जिल्हा ओबीसी काग्रेस प्रवक्ता घनश्याम बघेले, खिरचंड येळे, अशोक शेंडे , माणिकचंद मेळे,देवचंद कुंभलकर,दिलराज शिंघाडे, भीमराज टेंभूर्णीकर,राहुल कटरे,नामदेव नाईक,चौकलाल वालवे, नानेश्वर कटरे, उत्तम कटरे, टेकचंद बिसेन आदि उपस्थित होते.