अर्जुनी मोरगाव नगरपंचायत विषय समिती सभापतीपदी आरेकर,शहारे व भैय्या यांची वर्णी

0
109
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अर्जुनी मोरगाव- स्थानिक नगरपंचायत विषय समिती सभापतीपदाची निवडणूक बुधवारी पार पडली.यात बांधकाम सभापतीपदी सागर आरेकर,पाणीपुरवठा व स्वच्छता सभापतीपदी यशकुमार शहारे तर स्थायी समिती सदस्यपदी ममता भैय्या यांची वर्णी लागली आहे.विशेष उल्लेखनीय म्हणजे ही निवडणूक अविरोध पार पडली.
बांधकाम सभापती पदावर राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकाची वर्णी लागल्याने आ मनोहर चंद्रिकापुरे यांचे सहकार्याने शहर विकासाला अधिकाधिक निधी उपलब्ध होईल असा डॉ सुगत चंद्रिकापुरे यांनी नवनिर्वाचितांच्या स्वागतप्रसंगी विश्वास व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे,नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे,उपाध्यक्ष ललिता टेंभरे, नगरसेवक दानेश साखरे,दिक्षा शहारे,अतुल बन्सोड,राधेश्याम भेंडारकर, संजय पवार,सुषमा दामले,संध्या शहारे,सपना उपवंशी, शिला उईके,इंदू लांजेवार,विजय कापगते, उपस्थित होते.पीठासीन अधिकारी म्हणून परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी मानसी पाटील,तहसीलदार विनोद मेश्राम, प्रशासकीय अधिकारी अमोल जाधव उपस्थित होते.