गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस रस्त्यावर

0
13

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात गॅस दरवाढीच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांच्या नेतृत्वात जनता महाविद्यालय चौकात आंदोलन केले गेले. आंदोलनकर्त्या महिलांनी ‘बहोत हो गई महगाई की मार, बस करो मोदी सरकार’, ‘गॅस दरवाढ कमी करा’, ‘महंगा सिलेंडर महंगा तेल, मोदीजी आप सरकार चालाने मे हो गये फेल’ अशा जोरदार घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्वांचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत आहे. वाढत्या महागाईने सामान्य नागरिक बेजार झालेला आहे. मात्र केंद्र सरकार महागाई कमी करण्याऐवजी नेहमी नवे दर जाहीर करून सर्वसामान्यांना एकामागून एक धक्का देत आहे, अशी जोरदार टीका केंद्र सरकारवर केली. गॅस दरवाढ मागे घ्या अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उईकेंनी दिला. आंदोलनात जिल्हाध्यक्ष बेबी उईके जिल्हा उपाध्यक्ष वंदना आवळे पूजा शेरकी, सरस्वती गावंडे, वनिता मावलीकर विधानसभा अध्यक्ष किरण साळवी सहभागी झाल्या होत्या.