ध्येय धोरण जनतेपर्यंत पोहचवून पक्ष बळकट करा – खा.प्रफुल पटेल

0
11

गोंदिया,दि.11ः- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचा आहे. शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून पक्ष सातत्याने काम करीत आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठ्या आशेने पाहत आहे. नागरिकांच्या समस्या फार शुल्लक असतात. त्यामार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे या माध्यमातून पक्ष बळकटीला हातभार लागेल. तसेच एक तास राष्ट्रवादी साठी देऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे त्यामुळे आगामी सर्व निवडणुकांना सामोरे जातांना पक्षाला अधिक बळ मिळेल असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

बाजार चौक, आसोली येथे गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

खासदार प्रफुल पटेल पुढे म्हणाले की, गोंदिया भंडारा जिल्ह्यात मुख्यतः धानाचे पीक घेतले जाते मात्र धान उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही हि खंत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ने धानाला ७०० रुपये बोनस देऊन शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले हे सर्वश्रुत आहे. सिंचनाच्या समस्याही जैसे थे च्या परिस्थितीत आहेत. मात्र शेतकरी असो कि सर्वसामान्य नागरिक या सर्वांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार अशी ग्वाही श्री पटेल यांनी दिली

खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंचा बिरजूलाताई भेलावे, उपसरपंच मनीष पंधरे, सदस्य : पुस्तकला लांजेवार, शांताबाई धुर्वे, प्रमेश उईके, राजू गणवीर, उर्मिला गायधने, भावना गडपायले यांचा सम्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या मेळाव्या प्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, विरेंद्र जायस्वाल, गणेश बरडे, सुरेश हर्षे, सौ. पूजा सेठ, चुन्नीभाऊ बेदरे, बाळकृष्ण पटले, कुंदन कटारे, रजनी गौतम, उषा मेश्राम, सरला चिखलोंडे, किशोर तरोणे, कमलबापू बहेकार, अखिलेश सेठ, शंकरलाल टेभरे, नितीन टेभरे, राजेश भक्तवर्ती, चुन्नीलाल सहारे, प्रदीप रोकडे, डॉ मोहित गौतम, विनोदभाऊ कन्नमवार, शोभाताई गणवीर, विजय रहांगडाले, लीकेश चिखलोंडे, पिंटू बनकर, रमण डेकाटे, नागरतं बन्सोड, ओंकार कटरे, धम्मानंद गणवीर, सयाराम भेलावे, सुनील पटले, शैलेश वासनिक, सुरेश कावडे, रामू चुटे, पुरण उके, डॉ मोतीराम शिवणकर, सुरेश चुटे, टेकचंद भेलावे, बंटी भेलावे, विजुभाऊ बन्सोड, अशोक गायधने, गुड्डू भेलावे, लोकचंद धुर्वे, दुलीचंद धुर्वे, दिनेश उके, बंगेश बीजेवार, जोशीराम भेलावे, शिवलाल नेवारे, भरत बाणेवार, विजय ठाकूर, उमाशंकर ठाकूर, माधव शिवणकर, बाबुलाल गडपायले, गंगाराम कापसे, शैलेश कांबळे, बालू कोसरकर, राजकुमार महारवाडे, गोविंद ठाकूर, हेमू राखडे, शालिक हरिणखेडे, मनोज गायधने, मारोती हत्तीमारे, राधेश्याम कोरे, अनिल डोंगरे, देवीनं सोनवाने, कमल चुटे, रणजित बन्सोड, विजय गडपायले, जयलाल चंद्रिकापुरे, शिवनाथ नंदगावली, प्रदीप नागवंशी, राधेश्याम कटरे, सुरेंद्र रिनाईत, बुधराम भांडारकर, अशोक ठाकूर, संतोष ठाकूर, बाळू मुनेश्वर, काशिनाथ मेश्राम, सावन पारधी, शंकर कुरंजेकर, लखुभाऊ ठाकूर, होमराज गौतम, योगराज गौतम, रूपसेन बघेले, चैनलाल दमाहे, दिनेश फुंडे, ताराचंद मेंढे, गणेश फुंडे, सहेसराम उपवंशी, राजेंद्र रानगिरे, जितेंद्र वरखडे, संजय चौहान, मनोहर पटले, आंनद मेश्राम, मदन कापसे, गुणेश्वर पाटील, भूमेश्वर पटले, अमृत पटले, राजेश भालाधरे, जियालाल पटले, गोल्डी दमाहे, संजय बिसेन, रमेश हरिनखडे सहित असंख्ये कार्यकर्ता उपस्थित होते.